कडेकोट बंदोबस्तात आगरतळा महानगरपालिका (AMC) आणि त्रिपुरातील इतर नागरी संस्थांच्या २०० हून अधिक जागांसाठी आज सकाळपासूनच (रविवारी) मतमोजणी सुरू झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील आठही जिल्ह्यांतील १३ केंद्रांवर मतमोजणी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामान्य सुरक्षा व्यवस्थेव्यतिरिक्त, त्रिपुरा राज्य रायफल्स आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल देखील मतमोजणी केंद्रांलगतच्या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रातून परतत असताना तेलियामुरा येथे एआयटीसी मतमोजणी समितीचे सदस्य रणथिंद्र आणि प्रभाग १४ चे उमेदवार अभिरोय दास यांच्यावर भाजपने हल्ला केल्याचा दावा टीएमसीने केला आहे.

मतदान झालेल्या २२२ जागांपैकी सीपीआय(एम) तीन जागांवर, टीएमसी एका जागेवर आणि टिप्रा मोथा एका जागेवर विजयी झाले आहेत. भाजपाने ११२ जागा बिनविरोध जिंकल्या. उर्वरित २१७ जागांवर विजयी घोषित करण्यात आले.

आगरतळा महानगरपालिकेच्या सर्व ५१ प्रभागात भाजपाचा विजय झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tripura agartala elections bjp won in 51 wards vsk
First published on: 28-11-2021 at 17:03 IST