scorecardresearch

VIDEO : ‘भाजपा नेत्याने उचलली अमित शहांची चप्पल’; ‘तेलंगणासाठी अभिमान’ म्हणत TRS कडून व्हिडिओ ट्वीट

तेलंगणा राष्ट्र समितीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे.

VIDEO : ‘भाजपा नेत्याने उचलली अमित शहांची चप्पल’; ‘तेलंगणासाठी अभिमान’ म्हणत TRS कडून व्हिडिओ ट्वीट
तेलंगणात भाजपा नेत्याने अमित शाहंची चप्पल उचलली

गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलेल्या अमित शाहंना एका भाजपा नेत्याने चप्पल आणून घालायला दिल्याचा प्रकार घडला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने या घटनेचा व्हिडिओ ट्वीट करत भाजपावर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा- भारतीय नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत असलेला इस्लामिक स्टेटचा अतिरेकी रशियाच्या ताब्यात

अमित शाह सध्या हैदराबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी ते एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर तेलंगणा भाजपा प्रमुख बंदी संजय कुमार यांनी अमित शाहंच्या चपला आणल्या आणि त्यांना घालायला दिल्या. तेलंगणा राष्ट्र समितीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे. ‘तेलंगणासाठी अभिमान’ म्हणत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे पुत्र के.टी. रामाराव यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

तेलंगणा राष्ट्र समितीचे सोशल मीडिया नियंत्रक वाय सतीश रेड्डी यांनीही हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. “सर्वोत्तम गुलामगिरी ” म्हणत संजय कुमारांवर टीका केली आहे.

हेही वाचा- “’आप’ फोडा आणि आमच्यासोबत या”; भाजपाने ऑफर दिल्याचा मनिष सिसोदियांचा दावा

काँग्रेसचे माजी नेते राजगोपाल रेड्डी यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. पक्षात स्वागत करताना, रेड्डी यांचा भाजपमध्ये प्रवेश ही केसीआर सरकारच्या समूळ उच्चाटनाची सुरुवात आहे. केसीआर सरकारने तेलंगणातील जनतेच्या विश्वासघात केला. केसीआर सरकार तेलंगणा मुक्ती दिन साजरा करत नाही. सप्टेंबरमध्ये तेलंगण मुक्ती दिन साजरा करू, असे वचन दिले होते. मात्र, केसीआर सरकारने त्यांचे आश्वासन पूर्ण केले नाही, असा हल्लाबोलही केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या