ट्रक चालकांच्या कमतरतेमुळे शनिवारी ब्रिटनमधल्या ट्रक चालकांच्या कमतरतेमुळे सरकारला एक महत्त्वाचं पाऊल उचलणं भाग पडलं आहे. यासाठी विदेशी चालकांना तात्काळ वर्क व्हिसा देण्याचा निर्णय इंग्लंड सरकारने घेतला आहे. शनिवारी ब्रिटनमधील गॅस स्टेशनांवर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. देशभरात वाहनधारकांनी आपल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. एका मोठ्या वितरकाने सांगितले की ही रेशनिंगची विक्री आहे आणि अनेक ऑपरेटर्सनी सांगितले की त्यांना काही फोरकोर्ट बंद करावे लागत आहेत, ज्यामुळे घाबरुन लोक इंधन साठा करत आहेत.

सरकारी मंत्री आणि तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की तेथे पेट्रोल किंवा डिझेलचा पुरेसा साठा आहे त्यामुळे काळजीचे कारण नाही, परंतु ट्रक चालकांची कमतरता असल्याने रिफायनरीजमधून गॅस स्टेशनवर इंधन वाहतुकीस अडथळा येत आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Brazilian woman brings dead man in wheelchair to bank to sign loan
पैशासाठी काहीपण! मृत काकांना व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहचली महिला अन्….धक्कादायक घटनेचा Video Viral
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
RBI Monetary Policy Meeting 2024 Repo Rate Unchanged Marathi News
RBI MPC Meet : रेपो दरात कोणताही बदल नाही; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, कर्जदारांना दिलासा!

किरकोळ विक्रेत्यांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला त्यांच्या पुरवठ्यात लक्षणीय व्यत्यय येण्याचा इशारा दिल्याने, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की हेवी गुड्स व्हेइकल (एचजीव्ही) चालकांची कमतरता दूर करण्यासाठी ते अल्पकालीन उपाय शोधत आहे.
“कोणत्याही तात्काळ समस्या टाळण्यासाठी आम्ही तात्पुरते उपाय शोधत आहोत, परंतु आम्ही लागू केलेले कोणतेही उपाय अत्यंत काटेकोरपणे मर्यादित काळासाठी असतील,” जॉन्सन यांच्या डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.

“जगभरातील देशांप्रमाणे आम्ही देशभरात पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या ड्रायव्हर्सच्या तात्पुरत्या कमतरतेमुळे त्रस्त आहोत.”
यूकेची रोड हॉलेज असोसिएशन (आरएचए) म्हणते की ब्रिटनला सुमारे एक लाख ड्रायव्हर्सच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. ब्रेक्झिट आणि कोविड -१९ मुळे ड्रायव्हरचे प्रशिक्षण आणि चाचणी सुमारे एक वर्षासाठी थांबली होती.

वृत्तपत्रांनी असे वृत्त दिले आहे की, सरकार पाच हजारांपर्यंत परदेशी चालकांना ब्रिटनमध्ये अल्प मुदतीच्या व्हिसासाठी परवानगी देईल. लॉजिस्टिक कंपन्या आणि किरकोळ विक्रेत्यांनी काही महिन्यांपासून ही मागणी केली होती. मात्र सरकारने पूर्वी नकार दिला होता.