Donald Trump claims 48 Iranian leaders killed in a massive US-Israel joint operation : इराणविरोधातील युद्ध पेटले असून अमेरिका-इस्रायल संयुक्त हल्ल्यात ४८ इराणी नेते मारले गेल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसंच, ही कारवाई अत्यंत यशस्वी झाली असून अपेक्षेपेक्षा वेगाने प्रगती करत असल्याचंही ते म्हणाले. फॉक्स न्यूजच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“आपल्याला जे यश मिळत आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. ४८ नेते एकाच वेळी गेले आहेत. आणि ते वेगाने पुढे जात आहे”, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फॉक्स न्यूजशी बोलताना म्हणाले. १९७९ च्या क्रांतीनंतर इराणसाठी सर्वात महत्त्वपूर्ण क्षणांपैकी एक असलेल्या अमेरिका-इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर तणाव वाढला आहे. त्यानंतर इराणने मध्य पूर्वेतील ज्या देशांमध्ये अमेरिकन सैन्य आणि तळ आहेत त्या देशांना लक्ष्य करून प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले आहेत.

यापूर्वी, ट्रम्प यांनी म्हटले होते की इराणवरील हल्ले “इतिहासातील सर्वात हिंसक राजवटींपैकी एक”आहेत. अमेरिका फक्त आपल्यासाठी नाही तर जगासाठी काम करत आहे असे त्यांनी म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडातील पाम बीच येथील त्यांच्या मार-ए-लागो निवासस्थानातून हल्ल्याचे निरीक्षण करत आहे.