Trump Iran Ceasefire updates: Iran trolls US President Donald Trump using viral AI generated video content : अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत अद्याप साशंकता आहे. दुसरीकडे इराणकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सातत्याने ट्रोल केले जात आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील युद्धविरामाची मुदत वाढवल्यानंतरही हे सत्र थांबलेले नाही. नुकतेच हैदराबादमधील इराणच्या दूतावासाने एक एआयच्या मदतीने तयार केलेला व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविरामाची मुदत वाढवल्याच्या निर्णयाची थट्टा करण्यात आली आहे.

इराणच्या दुतावासाच्या अधिकृत हँडलने एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, “युद्धविराम कसा वाढवण्यात आला होता? व्हिडीओ इराणमध्ये व्हायरल होत आहे.” या ४५ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एआय जनरेटेड ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि इतर हे इराणच्या वाटाघाटी करणाऱ्या पथकाची वाट पाहाताना दिसत आहेत.

“इराणबरोबर आमच्या वाटाघाटी अतिशय उत्तम सुरू आहेत,” ट्रम्प यांचे एआय वापरून तयार केलेले कॅरिकेचर असा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. “जर इराण वाटाघाटींसाठी पुढे आला नाही, तर आम्ही त्यांच्यावर बॉम्ब टाकू,” असे संतप्त झालेले एआय ट्रम्प रिकाम्या खुर्च्यांना उद्देशून म्हणताना दिसतात. त्यानंतर ते रिकाम्या खोली. “नेमकं इराणी लोक आहेत कुठे?” असे ओरडत असल्याचेही दाखवण्यात आले आहे.

त्यानंतर लगेच त्यांचा एक सरकारी एक नोट त्यांना देतो ज्यावर, “ट्रम्प, शट अप” असे लिहिलेले दिसत आहे. या व्हिडीओच्या शेवटी ट्रम्प यांचे कॅरिकेचर म्हणते की, “ठीक आहे, तर मग मी पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम वाढवत आहे.” त्यानंतर ते खोलीच्या बाहेर निघून जाताना दिसतात.

नेमकं ट्रम्प काय म्हणाले होते?

प्रत्यक्षात ट्रम्प म्हणाले होते की, त्यांनी इराणच्या नेतृत्वाला युद्धाचा शेवट करण्यासाठी एक युनिफाईट प्रपोजल तयार करण्याकरिता अजून वेळ मिळावा यासाठी पाकिस्तानच्या विनंतीवरून इराणबरोबरच्या युद्धविरामाची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे इराणने अद्याप ते पाकिस्तानात आयोजित वाटाघाटीच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्याबाबत अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई म्हणाले की, “आम्ही चांगल्या भावनेने आणि गांभीर्याने या वाटाघाटींमध्ये सहभागी झालो होतो, परंतु वाटाघाटी करणाऱ्या दुसर्‍या पक्षाने (अमेरिका) याकडे अनादर आणि चांगल्या भावनेचा अभाव दाखवला आहे.”

“या आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेबरोबर होणाऱ्या शांतता वाटाघाटींच्या नवीन फेरीत सहभागी व्हायचे की नाही, हे इराणने अद्याप ठरवलेले नाही,” असेही ते म्हणाले.