कॅनडामध्ये रूग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने भारतीय वंशाचे प्रशांत श्रीकुमार यांचा मृत्यू झाल्याची घटना २२ डिसेंबर रोजी घडली होती. या घटनेनंतर कॅनडातील भारतीय वंशाच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला. रूग्णालयाच्या प्रतिक्षा दालनात प्रशांत यांना आठ तास बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना बोलावले असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रूग्णालयात त्रास सहन होत नसल्याचे प्रशांत यांनी डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांना सांगितले होते, परंतु, त्यांना प्रतिक्षा दालनात बसवून ठेवण्यात आले. आता या घटनेवर अमेरिकेतील युट्युबर व इन्फ्लुअन्सर अँड्रयू ब्रँका यांनी केलेल्या एका पोस्टवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. प्रशांत श्रीकुमार हे मुंबईतच राहीले असते तर त्यांना कॅनडातील रूग्णालयातले उपचार टाळता आले असते, अशी पोस्ट ब्रँका यांनी केली आहे.
अँड्रयू ब्रँका हे अमेरिकेतील युट्युबर व इन्फ्लुअन्सर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या विचारधारेचे ते कट्टर समर्थक आहेत. अँड्रयू ब्रँका यांनी प्रशांत श्रीकुमार यांना कॅनडामधील घुसखोर म्हटले आहे. प्रशांत श्रीकुमार यांच्या मृत्यूवर अँड्रयू ब्रँका यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणाले, “जर ती (प्रशांत यांच्या पत्नी) आणि तिचा पती मुंबईतच राहीले असते तर त्यांना कॅनडातल्या रुग्णालयातील उपचार टाळता आले असते आणि भारतीय रुग्णालयाचा फायदा घेता आला असता.” दरम्यान, ब्रँका यांनी या पोस्टसह कॅनडात १९५२ ते २०२५ दरम्यान झालेल्या स्थलांतराचा आलेख जोडला आहे. प्रशांत श्रीकुमार यांच्या मृत्यूला रूग्णालयातील डॉक्टर तसेच कर्मचारी जबाबदार असल्याचे त्यांच्या पत्नीने म्हटले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
Another Indian invader of Canada.
— Andrew Branca Show (@TheBrancaShow) December 26, 2025
I note that she and her husband could have easily avoided the shitty Canadian healthcare by staying in Mumbai and enjoying the shitty Indian healthcare. https://t.co/9pmMPoCbky pic.twitter.com/mzEFt5ksiD
भारतीयांना H1B व्हिसा बहाल करण्याला विरोध
अँड्रयू ब्रँका हे डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आहेत. ब्रँका यांनी याआधी देखील भारताच्या विरोधात अनेक पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केल्या आहे. अमेरिकेतील भारतीयांवर टीका करण्याची संधी ते सोडत नाहीत. अमेरिकेत H1B व्हिसावर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतात पाठवण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच त्यांनी एक लाख डॉलरमध्ये भारतीयांना H1B व्हिसा बहाल करण्याला विरोध केला होता. ब्रँका यांनी युट्युबवरील त्यांच्या ‘अँड्रयू ब्रँका शो’मधून भारतीयांना H1B व्हिसा देण्यास विरोध केला होता.
प्रशांत श्रीकुमार यांच्या पत्नीचा संताप
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रशांत यांच्या पत्नीने संताप व्यक्त केला आहे. “संध्याकाळी ८.१५ पर्यंत ते रुग्णालयाच्या हॉलमध्ये बसून होते. ते सातत्याने छातीत दुखत असल्याचं सांगत होते. त्यांचा रक्तदाब सातत्याने वाढत होता. त्यांचं शेवटचं ब्लड प्रेशर २१० इतकं नोंदवलं गेलं होतं. त्यांना फक्त पेनकिलर देण्यात आली.
Heartbreaking video revealing the reality of Canada’s emergency healthcare response. Indian-origin man Prashant Sreekumar dies after being made to wait 8 hours in an Edmonton hospital waiting room while lying on the floor pleading with chest pain. pic.twitter.com/IGIcDzgIWB
— Shiv Aroor (@ShivAroor) December 26, 2025
रुग्णालयाचं म्हणणं होतं की फक्त छातीत दुखणं ही मोठी समस्या नाही. याला हार्ट अटॅक म्हणता येणार नाही. संध्याकाळी त्यांना आत नेलं. ते काही क्षणासाठी उभे राहिले आणि खाली कोसळले. नर्स म्हणाली तिला हृदयाचे ठोके जाणवत नाहीत. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी माझे पती प्रशांत श्रीकुमार यांची हत्या केली. मी याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे”, असं त्या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.
