Donald Trump on Oil : व्हेनेझुएलावर पूर्णपणे सत्ता मिळाल्यावर या देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या माध्यमातून आर्थिक फायदा करून घेण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या हालचाली सुरू आहेत. त्यातच, व्हेनेझुएलातील तेल व्यापार लक्ष्य करण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात मध्यरात्रीच सोशल मिडिया पोस्ट केली. व्हेनेझुएला अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल तेल पुरवेल आणि त्यातून मिळणारे उत्पन्न दोन्ही देशांच्या “लोकांच्या फायद्यासाठी” वापरले जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसंच, तेल व्यापार सुमारे $५६ प्रति बॅरल असल्याने, हा व्यवहार $२.८ अब्ज इतका असू शकतो. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठे तेल साठे आहेत परंतु जागतिक उत्पादनाच्या १% पेक्षा कमी आहेत.
याबाबत माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की व्हेनेझुएलातील अंतरिम अधिकारी ३० ते ५० दशलक्ष बॅरल उच्च दर्जाचे, सॅन्कशन तेल अमेरिकेला सुपूर्द करणार आहेत. हे तेल त्याच्या बाजारभावाने विकले जाईल आणि त्या पैशांवर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून माझे नियंत्रण असेल. जेणेकरून ते व्हेनेझुएला आणि अमेरिकेच्या लोकांच्या फायद्यासाठी वापरले जाईल याची खात्री होईल! मी ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांना ही योजना त्वरित अंमलात आणण्यास सांगितले आहे. तेल स्टोरेज जहाजांद्वारे नेले जाईल आणि थेट अमेरिकेतील अनलोडिंग डॉकमध्ये आणले जाईल.”
अमेरिकेच्या विशाल पण संघर्षरत तेल क्षेत्राला अधिकाधिक अमेरिकन गुंतवणूक आणि तांत्रिक कौशल्यासाठी खुले करण्यासाठी व्हेनेझुएलावर दबाव वाढवला आहे. त्यामुळे व्हाईट हाऊस शुक्रवारी अमेरिकन तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे.
आम्हाला व्हेनेझुएला सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यामुळे व्हेनेझुएलामधील नागरिक आतापर्यंत कधीही झाले नसतील, इतके श्रीमंत होतील. अमेरिकेलाही आर्थिक, सुरक्षा आणि लष्करी सहकार्याच्या पातळीवर अनेक लाभ होणार आहेत, असं गृहसुरक्षा सल्लागार स्टीफन मिलर म्हणाले.
व्हेनेझुएलाचे २४ सुरक्षा कर्मचारी ठार
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या योजनांशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एक्सॉन, शेवरॉन आणि कोनोकोफिलिप्सचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी, कराकसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी आणि त्यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपांना सामोरे जाण्यासाठी अमेरिकेत नेण्यासाठी रात्री उशिरा झालेल्या अमेरिकन लष्करी कारवाईत किमान २४ व्हेनेझुएलाचे सुरक्षा कर्मचारी मारले गेले.
राष्ट्रपतींना मादुरोपेक्षा वाईट परिणाम भोगावे लागतील
व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला नकार दिला. या आठवड्याच्या सुरुवातीला, ट्रम्प यांनी इशारा दिला की रॉड्रिग्ज जर “योग्य ते करण्यात अयशस्वी ठरले तर त्यांना “मादुरोपेक्षाही वाईट” परिणाम भोगावे लागू शकतात. तसंच, अमेरिकन ऊर्जा कंपन्यांना देशाच्या तेल उद्योगात अधिक प्रवेश देणे अपेक्षित आहे.”
