रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या टीटीईवर रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. रेल्वेने या टीटीईला कामावरून काढून टाकलं आहे. आरोपी प्रवासी तिकीट परीक्षकाविरोधात (Travelling ticket examiner) रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव यांनी कठोर कारवाई केली आहे. ही घटना १३ मार्च रोजीची आहे. पीडित महिला तिच्या पतीसोबत अकाल तख्त एक्सप्रेसने (रेल्वे नंबर १२३१७) बिहारच्या काऊलवरून पंजाबच्या अमृतसरला जात होती. ही ट्रोन कोलकात्याहून अमृतसरला जाते.
प्रवासादरम्यान, टीटीई मुन्ना कुमार यांनी महिला प्रवाशाच्या डोक्यावर लघुशंका केली. त्यानंतर प्रवाशांनी या टीटीईला चोपलं. प्रवाशांनी चोप दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी टीटीईला अटक केली. आरोपी मुन्ना कुमार सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याला टीटीईच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. टीटीईने महिला प्रवाशी तिच्या सीटवर झोपलेली असताना तिच्या अंगावर लघुशंका केली होती. त्यानंतर ती उठली आणि ओरडू लागली. त्याचवेळी तिच्या पतीने टीटीईला पकडलं त्यानंतर इतर प्रवासीदेखील उठले.
दरम्यान, सहप्रवाशांना टीटीईचा प्रताप कळल्यानंतर ते त्याच्यावर तुटून पडले. आरोपी टीटीई मुन्ना कुमार नशेत होता, असं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती देताना जीआरपी पोलीस निरीक्षक नवरत्न गौतम म्हणाले की, अमृतसरचे राजेश त्यांच्या पत्नीसह ए-१ कोचवरून प्रवास करत होते. त्यांची पत्नी झोपलेली असताना बिहारचे टीटीटी मुन्ना कुमार यांनी या महिलेवर लघुशंका केली.
हे ही वाचा >> दोन बायका, कोर्टाचा अजब निर्णय ऐका…! मध्य प्रदेशमधल्या न्यायालयाने सोडवलं दोन बायकांचं भांडण
आरोपी नशेत होता की नाही याची चौकशी
टीटीईने महिलेवर लघुशंका केल्यानंतर प्रवाशांनी टीटीईला पकडलं आणि चोप दिला. हा टीटीई नशेत होता असं सांगितलं जात आहे. पीडित महिलेचे पती राजेश यांच्या तक्रारीनंतर आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आरोपी मुन्ना कुमार हा बिहारच्या बेगूसराय येथील रहिवासी आहे. तो सहारनपूर येथे रेल्वेत टीटीई म्हणून काम करत होता. तो या ट्रेनमधील प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी तैणात केलेला नव्हता. मुन्ना कुमार नशेत होता की नाही याचीदेखील चौकशी केली जात आहे.