अंकारा : आग्नेय तुर्कीच्या सानलिउर्फा प्रांतामधील सिवेरेक येथे एका शाळेमध्ये माजी विद्यार्थ्याने गोळीबार केला. या घटनेत किमान १६ जण जखमी झाले. यानंतर पोलिसांनी घेरल्यानंतर या १८ वर्षीय हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
जखमींमध्ये १० विद्यार्थी, चार शिक्षक, कँटिनचा कर्मचारी आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्लेखोराचा कोणताही गुन्हेगारीचा इतिहास नसल्याची माहिती देण्यात आली. या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तुर्कीमध्ये शाळेत गोळीबार होण्याच्या घटना दुर्मीळ आहेत.
