scorecardresearch

तुर्कस्तान, सीरियामध्ये भूकंपबळी ३९ हजारांवर

तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी मंगळवारी जाहीर केले, की गेल्या आठवडय़ात झालेल्या भूकंपामुळे तुर्कस्तानात ३५ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

Turkey and Syria
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

पीटीआय, अंताक्या : तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी मंगळवारी जाहीर केले, की गेल्या आठवडय़ात झालेल्या भूकंपामुळे तुर्कस्तानात ३५ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. देशाच्या स्थापनेनंतर गेल्या शतकातील ही सर्वात भयानक आपत्ती आहे. ढिगारा हटवण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने मृतांचा आकडा आणखीही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तुर्कस्तान-सीरिया या दोन्ही देशांतील एकूण भूकंपबळींची संख्या ३९ हजारांवर गेली आहे.

भूकंपानंतर बेघर झालेल्या हजारो नागरिकांपैकी बहुसंख्य नागरिक अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी धडपडत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे त्यांच्या त्रासात अधिक भर पडत आहे. १९३९ मध्ये तुर्कस्तानात एरिझकन भूकंपात सुमारे ३३ हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते. नुकत्याच झालेल्या भूकंपात भूकंपबळींच्या संख्येने ही संख्याही ओलांडली आहे. या भूकंपाचे ‘शतकातील आपत्ती’ असे वर्णन करताना एर्दोगान यांनी सांगितले, की यामुळे एक लाख पाच हजार ५०५ नागरिक जखमी झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 01:06 IST
ताज्या बातम्या