बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या

त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीचं निधन झालं आहे. लक्ष्य, अंदाज, सलाम-ए-इश्क सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या कुशल पंजाबीच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कुशल पंजाबीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. यासंबंधी कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र स्पॉटबॉय-ईने दिलेल्या वृत्तानुसार कुशल पंजाबीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कुशलचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. कुशल आणि करणवीर अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र होते.

करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुशल पंजाबीचा फोटो पोस्ट केला आहे. तो फोटो पोस्ट करत ‘तुझ्या निधनाची बातमी ऐकताच मला धक्का बसला आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही. मला माहित आहे तू जिथे कुठे आहेस तिथे खूश आहेस. तू ज्याप्रकारे तुझे आयुष्य जगत होतास त्याने मला प्रेरणा मिळाली,’ असे करणवीरने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

कुशलने १९९५ मध्ये ‘अ माउथफुल ऑफ स्काई’ या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘लव मैरिज’, ‘सीआयडी’, ‘देखो मगर प्यार से’, ‘कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोर’, ‘श्श्श… फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा 7’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’ ‘ईश्क मै मरजावा’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

कुशलने चित्रपटांमध्ये देखील सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. त्याने अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’, अजय देवगणसोबत ‘काल’ आणि सलमान सोबत ‘सलाम-ए-इश्क’ आणि ‘दन दना दन गोल’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुलशने यूरोपियन मुलीशी लग्न केले होते. २०१६ मध्ये त्याला एक मुलगा झाला. कुशलने त्याच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tv actor and salman khans salaam e ishq co star kushal punjabi passes away at 37 avb

Next Story
अनलजित सिंग
ताज्या बातम्या