TVK Chief Vijay claim to form government : टीव्हीके (TVK) प्रमुख विजय यांनी आज तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन तमिळनाडूमध्ये पुढील सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. त्यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाला ११८ या बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी किमान १० जागांची आवश्यकता आहे.
तामिळनाडूमधील २३४ जागांसाठी ९ एप्रिल रजी मतदान पार पडले. ४ मे रोजी लागलेल्या निकालात विजय जोसेफच्या पक्षाला सर्वाधिक १०८७ जागा मिळाल्या. मात्र बहुमतासाठी लागणाऱ्या ११८ जागांचा टप्पा गाठण्यासाठी त्यांना १० आमदारांची आवश्यकता होती. काँग्रेसचे ५ आमदार निवडून आले आहेत. तर सीपीआय आणि सीपीआयएम या डाव्या पक्षांचे चार आमदार निवडून आले आहेत. याशिवाय इतर लहान पक्षांना बरोबर घेऊन टीव्हीकेने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
बहुमत सिद्ध करावं लागणार
विजय जोसेफ यांना सभागृहात आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही जोसेफ यांना अधिक मदतीची गरज आहे. कारण काँग्रेसकडे फक्त पाचच जागा आहेत. काँग्रेस व्यतिरिक्त इतर कोण (अपक्षांसह) ‘टीम विजय’चा भाग होण्यासाठी सोबत येईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दोन जागा जिंकणारा व्हीसीके (VCK) पक्ष सध्या काय भूमिका घ्यावी, यावर अंतर्गत चर्चा करत आहे. या निवडणुकीत डीएमकेने ५९, एआयएडीएमकेने ४७, पीएमकेने ४, आययुएमएलने २, सीपीआयने २, सीपीआय(एम) ने २ आणि भाजपा, डीएमडीके व एएमएमकेने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
काँग्रेसच्या तामिळनाडू युनिटला, टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही याचा स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण मुभा दिली होती. तामिळनाडू काँग्रेसचे प्रभारी गिरीश चोडणकर यांनीही जाहीर केले होते की, दक्षिण भारतात भाजपाला सत्तेत येताना पाहण्यापेक्षा ते एका “धर्मनिरपेक्ष सरकारला” पाठिंबा देणे पसंत करतील. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील टीव्हीकेच्या (TVK) या प्रचंड विजयाने राज्यातील राजकारणात मोठे फेरबदल घडवून आणले असून डीएमके आणि एआयएडीएमकेची अनेक दशकांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. कोलाथूर मतदारसंघात टीव्हीकेच्या व्ही.एस. बाबू यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर एम.के. स्टालिन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आधीच दिला आहे.
