इमारतीच्या २५ व्या माळ्यावरुन खाली पडून जुळ्या भावांचा दुर्दैवी मृत्यू; मध्यरात्री झालेल्या घटनेमुळे खळबळ

ही दोन्ही मुलं नेमकी खाली कशी पडली याची माहिती अद्याप मिळालेली नाही

UP, Ghaziabad, Twins
ही दोन्ही मुलं नेमकी खाली कशी पडली याची माहिती अद्याप मिळालेली नाही

इमारतीच्या २५ व्या माळ्यावरुन खाली पडून १४ वर्षाच्या जुळ्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही दोन्ही मुलं नेमकी खाली कशी पडली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. गाजियाबादमध्ये ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांची वडील कामानिमित्त मुंबईला होते. घरात दोन्ही भावांसोबत आई आणि बहीण होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दोन्ही मुलं खाली पडली आणि जागीच मृत्यू झाला.

विजय नगर पोलीस ठाण्यच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “रात्री १ वाजण्याच्या सुमारास सत्यनारायण आणि सुर्यनारायण हे दोघे भाऊ इमारतीच्या २५ व्या माळ्यावरुन खाली पडले आणि जागीच मृत पावले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत”. दोघेही नववीत शिकत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Twins fall to death from 25th floor in up ghaziabad in midnight horror sgy

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?