Tech Layoff 2023 : अब्जाधीश एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचा मालकी हक्क मिळवल्यापासून या कंपनीत अनेक बदल झाले आहेत. ट्विटरमध्ये मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात साधारण ५० टक्के कर्मचारीकपात करण्यात आली आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा ट्विटरकडून आणखी काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे. प्रोडक्ट विभागासह अन्य काही विभागातील कर्मचाऱ्यांवर ही कारवाई होऊ शकते.

हेही वाचा >> Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्ट १0 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार? सत्या नडेला यांचा ईमेल; म्हणाले, “हा काळ…”

mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
mutual funds
SEBI ने म्युच्युअल फंडांना विदेशी ETF मध्ये गुंतवणूक करण्यापासून रोखले, आता नवे पर्याय काय?

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मस्क यांनी आपली कर्मचारी संख्या ७५०० वरून ३५०० पर्यंत घटवली होती. त्यानंतर आणखी काही कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने नोकरीचा राजीनामा दिला. मस्क यांची काम करण्याची पद्धत मान्य नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर आता नव्या कर्मचारीकपातीच्या धोरणामुळे ट्विटरमधील कर्मचाऱ्यांची संख्या २००० पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; ११ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती

ट्विटर कंपनीकडून खर्च कमी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. तसेच कार्यालयांतील अतिरिक्त वस्तूंचाही लिलाव केला जात आहे. मस्क यांनी ठिकठिकाणच्या ट्विटर कार्यालयांचे भाडेदेखील थकवले असल्याचा दावा केला जात आहे.