फेसबुकनं आपलं नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने याबाबत घोषणा करत या निर्णयामागील कारणं सांगितली. या नामांतरानंतर फेसबुक इतकंच लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या ट्विटरने या संपूर्ण घडामोडींवर फेसबुकची फिरकी घेत टोला लगावला. ट्विटरने एक ट्वीट केलं त्यात म्हटलं आहे, “मोठी बातमी… लोल.. जस्ट मस्करी करतोय… आम्ही अजूनही ट्विटरच आहोत.” या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरने फेसबुकच्या निर्णयावर केलेल्या या चेष्टामस्करीवर मॅकडोनाल्डसह अनेक व्हेरिफाईड अकाऊंटनेही प्रतिक्रिया दिल्यात. मॅकडोनाल्डने ट्विटरला टॅग करत यावर रिप्लाय केला आणि म्हटलं, “तुम्ही अजूनही तुमचे ५९.६ मिलियन मॅकनगेट्स नेलेले नाहीत.” यावर ट्विटरने रिप्लाय करत आता आम्ही ५९.६ मिलियन नसून ६०.३ मिलियन झालो असल्याचं ट्वीट केलं.

अमेरिकन फास्ट फूड रेस्टॉरन्ट वेंडीजने देखील यावर प्रतिक्रिया देत चिमटा घेतलाय. आम्ही आमचं नाव ‘मीट’ असं बदलत असल्याची प्रतिक्रिया वेंडीजने दिलीय.

हेही वाचा : मोठी बातमी! ‘फेसबुक’ने आपलं नाव बदललं; मार्क झुकरबर्गने केली नव्या नावाची घोषणा, लोगोतही बदल

“गंभीर आरोपांवरून लक्ष हटवण्यासाठी नाव बदलण्याचा निर्णय”

फेसबुकने नाव बदलण्याच्या निर्णयावर अनेक लोक टीकाही करत आहेत. फेसबुकवर झालेल्या गंभीर आरोपांवरून लक्ष हटवण्यासाठीच हा नाव बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप टीकाकार करत आहेत.

‘फेसबुक’ने आपलं नाव बदललं; मार्क झुकरबर्गने केली नव्या नावाची घोषणा

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदललं आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना आता कंपनी जी कामं करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं झुकरबर्ग म्हणाला आहे. झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितलं आहे. फेसबुकचं नवं नाव मेटा असं असेल.

मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअ‍ॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअ‍ॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं. स्क्रीनवर टाइप करण्यापासून सुरुवात करत आज आपण मोबाईपर्यंत येऊन पोहचलोय. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसं आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही मेटा या नावाने ओळखले जाणार आहोत, असं मार्क झुकरबर्ग म्हणाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter first reaction over facebook name change to meta pbs
First published on: 29-10-2021 at 10:07 IST