टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर ट्विटरने आता इलॉन मस्क विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. तसेच इलॉन मस्कला प्रति ट्विटर शेअर $54.20 या दराने विलीनीकरण पूर्ण करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी ट्वीटरने चान्सरी न्यायालयाला केली आहे.

ट्वीटरच्या कायदेशीर कारवाई करण्यावरून इलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मस्क यांनी “Oh the irony lol.” असे ट्वीट केले आहे.

इलॉन मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. अंतराळात संशोधन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करणारे मस्क हे ट्विटरचे सर्वेसर्वा होतील, अशा चर्चा सुरू होती. एप्रिल महिन्यात त्यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर एवढी प्रचंड रक्कम खर्चून ट्विटर खरेदी करत असल्याचे जाहीर केले होते. ट्विटरच्या संचालक मंडळानेसुद्धा या व्यवहाराला मंजुरी दिली होती.

मात्र, ट्वीटरवरील बनावट खात्यांची पुरेशी माहिती कंपनी देत नाही, त्यामुळे मी हा व्यवहार रद्द करत असल्याचे मस्क यांनी जाहीर केले होते. महत्त्वाचे म्हणजे मजकुरावरील निर्बंध उठवणे तसेच बनावट खाती नष्ट करणे अशा अनेक गोष्टी करणार असल्याचे मस्क यांनी याआधीच स्पष्ट केले होते.

हेही वाचा – VIDEO : रोहितच्या षटकारामुळे चिमुकली जखमी; स्टेडियममधील काळजाचा ठोका चुकवणारा क्षण