पंजाबमधील अमृतसर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत दोन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. या दरोड्यात २२ लाख रुपायांची लूट करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून ही लूटमार केली आहे. या घनटेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची प्रतिक्रिया, पत्रकारांनी प्रश्न विचारताच म्हणाले, “पुन्हा…”
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (१६ फेब्रुवारी) दोन सशस्त्र दरोडेखोर पंजाब नॅशनल बँकेच्या अमृतसरमधील एका शाखेत घुसले. त्यांच्याजवळ पिस्तूल होते. यापैकी एक दरोडेखोर बँकेच्या दरवाजाजवळ थांबला तर दुसऱ्या दरोडेखोराने बँक कर्मचाऱ्यांकडे जात जीवे मारण्याचा धाक दाखवत बँकेतील पैसे मागितले. बँक कर्मचाऱ्यांनी भयभीत होऊन दरोडेखोरांना पैसे दिले.
हेही वाचा >> अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधीने ट्रान्सजेंडर महिलेला सर्वांसमोर विचारला लाजिरवाणा प्रश्न; व्हिडिओ व्हायरल
दरोडेखोरांनी बँकेतील एकूण २२ लाख रुपये लुटल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी ही लूट अवघ्या दोन ते तीन मिनिटांत केली आहे. बँक लुटून त्यांनी घटनास्थळावरून पळ खाढला. दरम्यान, पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.