पोरबंदर : गुजरातमधील पोरबंदरनजीकच्या एका गावात शनिवारी सायंकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यात दोन जवान ठार झाले, तर अन्य दोन जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे जवान सीआरपीएफच्या मणिपूरमधील बटालियनचे आहेत. पुढील महिन्यात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना निवडणूक आयोगाने येथे तैनात केले होते, अशी माहिती पोरबंदरचे जिल्हाधिकारी ए. एम. शर्मा यांनी दिली. हे जवान तुकडा गोसा गावातील चक्रीवादळ निवारा केंद्रात राहत होते.

Rahul Gandhi letter to PM Modi : “…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता”, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल