मक्का मशिदीत क्रेन कोसळून १०७ ठार, दोन भारतीयांचा समावेश

जगातील सर्वात मोठी मशीद म्हणून ख्याती पावलेल्या अल्र-हरम मशिदीत शुक्रवारी क्रेन कोसळून १०७ जणांचा मृत्यू

मक्का येथील काबा या पवित्र स्थळाची तटबंदी असलेल्या आणि जगातील सर्वात मोठी मशीद म्हणून ख्याती पावलेल्या अल्र-हरम मशिदीत शुक्रवारी क्रेन कोसळून १०७ जणांचा मृत्यू झाला असून २३८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश असून अन्य १५ भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती जेधा येथील भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे. काही आठवड्यानंतर आलेल्या हज यात्रेसाठी हजारो भाविक जमू लागले असतानाच हा अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सध्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, जोरदार आलेल्या वादळामुळे येथील क्रेन कोसळून हा अपघात झाला. अपघातानंतर तात्काळ मदत पथके घटनास्थळी रवाना झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two indians among 107 dead after crane topples onto mecca grand mosque

ताज्या बातम्या