आयआयटी कानपूरच्या दोघा विद्यार्थ्यांना १. २० कोटींचे वेतन

आयआयटी कानपूरमध्ये शिकलेल्या दोन विद्यार्थ्यांना ओरॅकल या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बडय़ा कंपनीने तब्बल एक कोटी २० लाख रुपयांचे वार्षिक वेतन दिले आहे.

आयआयटी कानपूरमध्ये शिकलेल्या दोन विद्यार्थ्यांना ओरॅकल या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बडय़ा कंपनीने तब्बल एक कोटी २० लाख रुपयांचे वार्षिक वेतन दिले आहे. २२ डिसेंबरपासून हे दोन्ही विद्यार्थी ओरॅकलमध्ये रुजू होणार आहे. आयआयटी कानपूरमधील इतर ७६ विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून आठ ते २४ लाख रुपयांचे वार्षिक वेतन देण्यात आले आहे.
आयआयटी कानपूरमध्ये नुकतीच नोकरीभरती प्रक्रिया (प्लेसमेंट) राबवण्यात आली. त्यात विविध ५० कंपन्यांनी सहभाग घेतला, तर इतर २०० कंपन्यांनी सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे आयआयटी कानपूरच्या भरती प्रक्रिया विभागाचे अध्यक्ष विमल कुमार यांनी सांगितले. गुगल, ओरॅकल, मित्सुबिशी, अ‍ॅमॅझॉन, सिटी बँक, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या बडय़ा कंपन्यांनीही या भरती प्रक्रियेत भाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांनी ७६ विद्यार्थ्यांना नोकऱ्यांच्या प्रस्तावपत्राचे वाटप केले. बीटेक, एमटेक, एमबीए आणि एमएस्सी विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत भाग घेतला होता, असे सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two kanpur iit students get rs 1 20 crore annual salary package