काश्मीरच्या कुलगाममध्ये दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले.

dv soldier
संग्रहित छायाचित्र

पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील तृब्जी भागातील नौपुरा-खेरपुरा येथे शोध मोहीम सुरू केली.

त्यांनी सांगितले, की शोध मोहीम सुरू असताना चकमक उडाली. त्यात दोन दहशतवादी मृत्युमुखी पडले. मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे आणि ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two militants killed kashmir kulgam security forces encounter ysh

Next Story
चकमकीत ठार झालेल्या मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी