उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या सेवेतील दोन जवान आपसात भिडले; परस्परांवर लाठीमार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सुरक्षाव्यवस्थेत तैनात असलेले निमलष्करी दलाचे दोन जवान बुधवारी आपसात भिडले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सुरक्षाव्यवस्थेत तैनात असलेले निमलष्करी दलाचे दोन जवान बुधवारी आपसात भिडले. ऐन रस्त्यामध्ये या दोघांनी परस्परांवर तुंबळ लाठीमार केला. त्यामध्ये दोघेही जखमी झाले.
मुकुंद यादव आणि सुनील दीक्षित अशी या दोघांची नावे आहेत. १० प्रोव्हिन्शिअल आर्म्ड कॉन्स्टॅब्युलरीचे हे दोन्ही जवान आहेत. लखनौमधील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे अखिलेश यादव यांचा कार्यक्रम सुरू असताना या दोघांमध्ये बाचाबाची झाली. सुरुवातीला वरिष्ठांनी हस्तक्षेप करून दोघांमधील वाद मिटवले. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर दीक्षित यांनी यादव यांच्यावर आपल्याकडील काठीने हल्ला चढवला. त्याला यादव यांनीही प्रत्युत्तर दिले. दोघांमध्ये ऐन रस्त्यावर जोरदार लाठीमार झाला. दोघांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्यानंतर पुन्हा वरिष्ठांनी हस्तक्षेप करून त्यांच्यातील भांडणे सोडवली. नंतर दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two pac jawans injured in clash on duty for akhilesh yadavs function