जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल आणि अचानक तुम्हाला कळाले की विमान चालवणारे वैमानिकच झोपले आहेत. तर काय होईल? असाच एक प्रसंग नुकताच घडला आहे. सुदानमधील खार्तूमहून इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाला जाणाऱ्या विमानातील दोन वैमानिकांना विमान उडवतानाच झोप लागल्याची घटना घडली आहे. जवळजवळ २५ मिनिटे हे वैमानिक झोपले होते आणि विमान अॅटो पायलेट मोडवर उडत होते.

हेही वाचा- जन्माष्टमीनिमित्त ब्रिटनच्या PM पदाच्या शर्यतीत असणारे ऋषी सुनक पोहोचले ISKCON मंदिरात; पत्नीसोबतच्या फोटोंची कॅप्शन चर्चेत

३७ हजार फूट उंचीवर होते विमान

ही घटना घडली तेव्हा विमान ३७,००० फूट उंचीवर होते. विमानामध्ये अनेक प्रवासी होते. अदिस अबाबासाठी जाणारे विमान ET343 नियुक्त केलेल्या धावपट्टीवर उतरले नाही. तेव्हा हवाई वाहतूक नियंत्रकांनी वैमानिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे काहीतरी गडबड झाल्याची शंका नियंत्रकांना आली. सुदैवाने, ऑटो पायलटपासून संपर्क तुटल्यानंतर जोरात हॉर्न वाजू लागला आणि त्याच्या आवाजाने वैमानिकांना जाग आली. त्यानंतर वैमानिकांनी सुरक्षितरित्या विमान धावपट्टीवर उतरवले.

हेही वाचा- देशातील ११ राज्यं, केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांचे Sex Partners हे पुरुषांपेक्षा अधिक; मात्र जोडीदाराशिवाय इतरांशी शरीरसंबंध ठेवण्यात…

थकव्यामुळे वैमानिकांना झोप लागली असल्याची शक्यता

विमानचालन विश्लेषक अॅलेक्स माचेरास यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. विमान नियुक्त केलेल्या धावपट्टीवर पोहोचले होते परंतु तरीही त्याचे लँडिंग झाले नाही. लँडिंगच्या वेळी दोन्ही पायलट झोपेत असल्याचे आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली. ही बाब खूप चिंताजनक असून थकव्यामुळे वैमानिकांना झोप लागली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

वैमानिकांना थकवा येणे ही नवी गोष्ट नाही. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. न्यूयॉर्कहून रोमला जाणाऱ्या विमानाचे दोनही वैमानिक वाटेतच झोपी गेल्याचा असाच एक प्रकार उघडकीस आला होता.