बंगळूरुमधील घटना; नागरी विमान वाहतूक महासंचालकांचे चौकशीचे आदेश

infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
jharkhand marathi news, logistic company fraud
झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा

बंगळूरुतील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलेली दोन विमाने हवेत एकमेकांच्या इतकी जवळ आली की धोकादायक स्थिती निमार्ण झाली. ही दोन्ही विमाने एकमेकांना धडकली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र आकाशात मोठा अपघात होता होता वाचला, अशी माहिती नागरी विमान वाहतूक विभागाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली. ९ जानेवारी रोजी ही घटना घडली असून अरुण कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या घटनेची माहिती कोणत्याही लॉगबुकमध्ये नोंदवण्यात आली नाही आणि भारतीय विमान प्राधिकरणालाही (एएआय) यासंदर्भात कळवण्यात आली नाही. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अरुण कुमार यांनी दिला.

या घटनेनंतर त्याची कोणतीही माहिती विमान प्राधिकरणाला देणे आवश्यक होते. मात्र अशी कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने चौकशीअंती या घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे अरुण कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, ‘इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भात ‘इंडिगो’ची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘इंडिगो’च्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.

झाले काय?

बंगळूरु येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ९ जानेवारी रोजी ‘इंडिगो’ कंपनीच्या दोन विमानांनी पाच मिनिटांच्या अंतराने उड्डाण केले. या विमानांपैकी एक विमान बंगळूरुवरून कोलकाताला जात होते, तर दुसरे विमान भुवनेश्वरला जात होते. हवेमध्ये दोन विमानांमध्ये काही अंतर ठेवावे लागते, मात्र हे अंतर कमी झाल्याने ही विमाने एकमेकांच्या अगदी जवळ आली आणि धोकादायक स्थिती निर्माण झाली.  रडार नियंत्रकांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती दोन्ही विमानांच्या वैमानिकांना दिली. त्यामुळे मोठा अपघात टळला. या दोन्ही विमानांतील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित होते, असे विमान वाहतूक प्रशासनाने सांगितले.

‘संवाद’दरी…

बंगळूरु विमानतळावरील उत्तरेकडील धावपट्टी विमानाच्या उड्डाणासाठी आणि दक्षिणेकडील धावपट्टी विमाने उतरवण्यासाठी वापरण्यात येते. मात्र कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याने दक्षिण धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबतची माहिती त्यांनी हवाई वाहतूक नियंत्रकांना कळवली नाही, असे नागरी विमान वाहतूक विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.