स्नोडेनला ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेचे दबावतंत्र

अमेरिकन गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेनला आणखी प्रवास करण्याची परवानगी मिळता कामा नये, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. स्नोडेनवर अनेक आरोप असल्याने अमेरिकेला परत पाठवण्याशिवाय त्याला कुठेही जाऊ देता कामा नये,

अमेरिकन गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेनला आणखी प्रवास करण्याची परवानगी मिळता कामा नये, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. स्नोडेनवर अनेक आरोप असल्याने अमेरिकेला परत पाठवण्याशिवाय त्याला कुठेही जाऊ देता कामा नये, असे व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जे केर्नी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. स्नोडेनला आश्रय देण्याची तयारी लॅटिन अमेरिकेतील तीन देशांनी दर्शवली आहे. अमेरिकेच्या इंटरनेट हेरगिरी कार्यक्रमाचे बिंग फोडून स्नोडेन त्या देशातून पसार झाला आहे. तो पहिल्यांदा हाँगकाँगला गेला, तेथून मास्कोत आला आहे. अमेरिकेने त्याला ताब्यात घेण्यासाठी अमेरिका राजनैतिक पातळीवर सर्व ते प्रयत्न करत आहे. रशियासोबतप्रत्यार्पण करार नसला तरी रशियाने त्याला अमेरिकेला पाठवावे अशी अपेक्षा केर्नी यांनी व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: U s increases pressure to arrest snowden

ताज्या बातम्या