उदयपूरमधील टेलर कन्हैय्या लाल तेली यांच्या हत्येप्रकरणातील चार आरोपींना शनिवारी जयपूर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात घेऊन जात असताना संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. नागरिकांनी आरोपींना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

संबंधित आरोपींविरोधात लोकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘आरोपींना मरेपर्यंत फाशी द्या’ अशा घोषणा देणाऱ्या लोकांना रोखण्यात पोलिसांची दमछाक झाली. आरोपींना पोलीस व्हॅनमध्ये परत घेऊन जात असताना, जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

नेमकं प्रकरण काय आहे?
भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केली होती. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत असताना, मृत कन्हैय्या लाल यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याचाच राग मनात धरून आरोपी मोहम्मद रियाझ आणि घौस मोहम्मद यांनी २८ जून रोजी कन्हैय्या लाल यांची निर्घृण हत्या केली. क्रूरतेचा कळस म्हणजे आरोपींनी हत्या करतानाचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याच व्हिडीओतून आरोपींनी हत्येची कबुली देखील दिली होती.

हेही वाचा- नुपूर शर्मा यांना पाठिंबा देणारी पोस्ट केल्याने अमरावतीत हत्या? गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर NIA टीम घटनास्थळी दाखल

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच दिवशी दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली. त्यानंतर आसिफ हुसेन आणि मोहसीन खान यांना देखील पोलिसांनी अटक केली. शनिवारी आरोपींना तोंड झाकून जयपूर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे एनआयएकडे सोपवली आहेत. या घटनेचा पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) केला जात आहे.