उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायकाची हत्या करण्यात आल्याने सध्या देशभरात संताप आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. देशभरात संतापाची लाट असताना पोलिसांनी जेलमधील आरोपींना खाण्यासाठी बिर्याणी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं असून हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका कथित हिंदी न्यूज वेबसाईटने हे वृत्त प्रकाशित केलं असल्याची माहिती आहे. “अटक केल्यानंतर उदयपूरमधील हल्लेखोरांना राजस्थानधील जेलमध्ये बिर्याणी देण्यात आली. जर हे उत्तर प्रदेश असतं तर?” या मथळ्याखाली हे वृत्त प्रकाशित झालं होतं.

Udaipur Murder: हत्येनंतर हल्लेखोर पळून जात असताना रस्त्यावर रंगला थरार; पोलिसांनी रस्त्यात चोपले; पहा व्हिडीओ

यानंतर अनेकांनी ही बातमी ट्वीटरला शेअर केली होती. एका वृत्तवाहिनीच्या संपादकानेही हे ट्वीट केलं होतं, जे नंतर त्यांनी डिलीट केलं.

राजस्थान पोलिसांचं स्पष्टीकरण –

“खोटी बातमी सध्या व्हायरल होत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस त्यांच्याशी सौम्यपणे वागणार नाहीत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही बांधील आहोत,” असं ट्वीट राजस्थान पोलिसांनी केलं आहे. यावेळी त्यांनी सोबत बातमीचा स्क्रीनशॉटही शेअर केला असून हे खोटं वृत्त असल्याचं सांगितलं आहे.

उदयपूरमध्ये नेमकं काय झालं आहे –

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा यांचं समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली. उदयपूरमध्ये त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी तलवारीने वार केले आणि या हल्ल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पाहा व्हिडीओ –

कन्हैयालाल तेली असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी दुचाकीवरून दोघे जण आले आणि कापड मोजमापाच्या बहाण्याने त्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात आल्यावर त्यांनी कन्हैयालालवर तलवारीने सपासप वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एनआयएकडे या घटनेचा तपास सोपवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udaipur murder rajasathan police tweet fake alert of killers served biryani in jail sgy
First published on: 29-06-2022 at 16:12 IST