scorecardresearch

उदयपूर हत्या प्रकरण : तालिबानी मानसिकता मान्य नाही, दोषींवर कठोर कारवाई करावी- अजमेर दर्गा प्रमुख

राजस्थानमधील उदयपरू येथे शिवणकाम व्यावसायिकाची हत्या झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय. राजस्थानमध्ये काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत.

Ajmer Dargah deewan Syed Zainul Abedin Ali Khan
अजमेर दर्गा दिवान जैनुल अबेदिन अली खान

राजस्थानमधील उदयपरू येथे शिवणकाम व्यावसायिकाची हत्या झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय. राजस्थानमध्ये काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपींनी या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दरम्यान, अजमेर दर्गा दिवान जैनुल अबेदिन अली खान यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी भारतातील मुस्लीम देशात तालिबानी मानसिकतेला थारा नाही. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> उदयपूर हत्या प्रकरण : ‘सगळीकडे तणावाचे वातावरण; मोदी, अमित शाहांनी देशाला संबोधित करावं,’ राज्यस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विनंती

“कोणताही धर्म मानवतेविरुद्ध हिंसेला प्रोत्साहन देत नाही. विशेष करुन इस्लाम शांततेचा पुरस्कार केला जातो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका गरिब माणसावर हल्ला करण्यात आला आहे. इस्लामध्ये हा अपराध आहे,” असे खान यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>> उदयपूर हत्या प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले ‘धर्माच्या नावावर…’

तसेच, “मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची सरकारला विनंती करतो. भारतातील मुस्लीम आपल्या देशात तालिबानी मानसिकता कधीही येऊ देणार नाहीत,” असेदेखील खान यांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> नूपुर शर्माचे समर्थन करणाऱ्याची हत्या; उदयपूरमधील घटनेनंतर तणाव

उदयपूरमध्ये नेमकं काय घडलं?

राजस्थानमधील उदयपूर येथे एका शिवणकाम व्यावसायिकाची मंगळावारी (२८ जून) हत्या करण्यात आली. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी आंदोलन केले जात आहे. कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Udaipur tailor kanaiyalal murder would not allow taliban mindset in india said ajmer shrine chief after prd

ताज्या बातम्या