Good News: करोना लसीची गरज नाही, गोळी आली, इंग्लंडमध्ये मिळाली मान्यता

अमेरीका, युरोप आणि इतर काही देशांतील संबंधित या औषधाचा आढावा घेत आहेत.

Merck england
(Photo : AP)

इंग्लंडने करोनाच्या यशस्वी उपचारासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या अँटीव्हायरल गोळीच्या सशर्त वापरास मान्यता दिली आहे. ही गोळी किती लवकर उपलब्ध होईल हे स्पष्ट नसले तरी या गोळीवर उपचार करणे योग्य असल्याचे ओळखणारा इंग्लंड हा पहिला देश आहे. १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या करोना संक्रमित लोकांना ही गोळी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्यामध्ये किमान एक घटक दिसून येतो ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. या औषधाचे नाव ‘मोल्नुपिरावीर’ (molnupiravir) आहे. कोविडचा सौम्य संसर्ग असलेल्या लोकांना ही गोळी दिवसातून दोनदा घ्यावी लागेल.

ही अँटीव्हायरल गोळी करोनाची लक्षणे कमी करते आणि लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल. 

इंग्लंडचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले, “आमच्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. इंग्लंड जगातील पहिला देश आहे ज्याने अशा अँटीव्हायरसला मान्यता दिली आहे जे करोनावर उपचारासाठी घरीच घेतल्या जाते.”

अमेरीका, युरोप आणि इतर काही देशांतील संबंधित या औषधाचा आढावा घेत आहेत. अमेरीकेच्या  फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने गेल्या महिन्यात सांगितले की ते गोळीची सुरक्षा आणि परिणामकारकता शोधण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस पॅनेलची बैठक बोलावतील. औषध निर्माता कंपनी ‘मर्क’ने हे औषध विकसित केले आहे. ऑक्टोबरमध्ये इंग्लंड अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते की त्यांनी ‘मोल्नुपिरावीर’चे  ४,८०,००० डोस मिळवले आहेत आणि या हिवाळ्यात आणखी हजारो लोकांवर उपचार करण्यात मदत होण्याची अपेक्षा त्यांना अपेक्षा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uk becomes first country to approve merck oral covid pill srk

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या