हनिमूनसाठी भारतात आलेल्या ‘त्या’ परदेशी जोडप्याने बुक केली संपूर्ण ट्रेन

लग्नानंतर हनिमूनचे क्षण प्रत्येक जोडप्यासाठी खास असतात. आयुष्यभराच्या त्या गोड आठवणी असतात. त्यामुळे प्रत्येक जोडपे आपल्या हनिमूनला खास बनवण्यासाठी काही ना काही हटके प्लानिग करतात.

love story, marathi love story, rural love story, romantic love, love forever, love stories in marathi

लग्नानंतर हनिमूनचे क्षण प्रत्येक जोडप्यासाठी खास असतात. आयुष्यभराच्या त्या गोड आठवणी असतात. त्यामुळे प्रत्येक जोडपे आपल्या हनिमूनला खास बनवण्यासाठी काही ना काही हटके प्लानिग करतात. जो़डीदाराला सरप्राईज देण्याचा दोघांचा प्रयत्न असतो. नुकतचं ब्रिटनमध्ये विवाहबद्ध होऊन भारतात हनिमूनसाठी आलेल्या एका जोडप्याने नीलगिरी माऊंटन रेल्वेची संपूर्ण ट्रेन बुक केली होती.

नीलगिरी हे तामिळनाडूतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ग्राहॅम विलियम आणि सिल्विया प्लासिस या जोडप्याने निलगिरीच्या सुंदर पर्वतरांगांचा आनंद घेताना एकांत मिळावा यासाठी ही तीन डब्ब्यांची संपूर्ण ट्रेन बुक केली होती. दक्षिण रेल्वेच्या सालेम विभागाने नीलगिरी माऊंटन रेल्वेची विशेष चार्टर्ड सेवा पुन्हा सुरु केली असून ग्राहॅम आणि सिल्विया पहिले प्रवासी ठरले आहेत.

त्यांनी रेल्वेच्या आयआरसीटीसी मार्फत ही संपूर्ण ट्रेन बुक केली होती. मेट्टपालयम ते ऊटी या ४८ किलोमीटरच्या एकमार्गी प्रवासासाठी या जोडप्याने २.५० लाख रुपये मोजले. १४३ प्रवासी क्षमता असलेल्या या ट्रेनमध्ये चालक सोडल्यास ग्राहॅम आणि सिल्विया दोघेचजण होते. साडेपाच तासांच्या प्रवासात ही ट्रेन एकूण १३ बोगदे आणि जंगलामधून जाते.

ऊटी येथे उतरल्यानंतर या प्रवासात निसर्गाचे अनोखे रुप पाहायला मिळाल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ही ट्रेन सकाळी ९.१० मिनिटांनी मेट्टपालयम येथून निघाल्यानंतर दुपारी २ वाजून २० मिनिटांनी ऊटी येथे पोहोचली. कुन्नूर रेल्वे स्टेशन आणि ऊटी येथे उतरल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दोघांचे स्वागत केले. नीलगिरी माऊंटन रेल्वेचा युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश होतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uk couple come to india for honeymoon book train

ताज्या बातम्या