भारतीय बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून भारताबाहेर पळालेल्या विजय मल्ल्याची याचिका युके येथील कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मल्ल्याला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणांचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. UK कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश आल्याचे मानले जाते आहे. मल्ल्याला भारतात आणण्यासाठीच्या संदर्भात हे एक सकारात्मक पाऊल पडल्याचे मानले जाते आहे.

काय आहे विजय मल्ल्या प्रकरण?

देशभरातल्या बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज त्याने बुडवलं आहे. विजय मल्ल्याचं सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेस्टमिनिस्टर कोर्टात गेली काही दिवस सुनावणी सुरू होती. भारतात आल्यावर कायद्याच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही याची विजय मल्ल्याला भीती वाटते. त्याच्या प्रकरणावर येवढं राजकारण झाल्यामुळे माध्यमांचा दबावही त्याच्यावर आहे. राजकारण, कायद्याची लांबलचक चालणारी प्रक्रिया यामुळे भारतात येण्याचं विजय मल्ल्या टाळत आहे.

मल्ल्याला आणण्यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये गेली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. कोर्टाचा निकाल सकारात्मक आला तर मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे.