टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील कारभाराची तेथील तपास यंत्रणांनी फौजदारी चौकशी सुरू केली असल्याचे वृत्त ‘द डेली टेलिग्राफ’ने दिले आहे.
सध्या ब्रिटनमधील पोलाद उद्योग अडचणींमध्ये सापडला असून टाटा स्टीलने तेथील तोटय़ातील कारखाने बंद करून विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाश्र्वभूमीवर या वृत्ताकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील कारखान्यातून तयार होणाऱ्या पोलादाच्या घटकांबाबतच्या प्रमाणपत्रांमध्ये विक्रीपूर्वी फेरफार केल्याच्या संशयावरून ही चौकशी सुरू झाली आहे. बीएई, रोल्स-रॉइस यांच्यासह टाटा स्टीलच्या ५०० ग्राहकांना याचा फटका बसल्याचे वृत्तात म्हटले आहे. या प्रकरणी ब्रिटनच्या कारखान्यातून नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.