UK Political Crisis News ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली आहे. जो पर्यंत नव्या पंतप्रधानांची घोषणा होत नाही, तोपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत. “मला माझ्या कामगिरीचा प्रचंड अभिमान आहे, जोपर्यंत नवीन नेता येत नाही तोपर्यंत मी काम करत राहीन”, असं मत बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केलं आहे.

४० पेक्षा जास्त मंत्र्यांचा राजीनामा

अविश्वासाचा आरोप करत बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळातील ४० पेक्षा जास्त आमदारांनी आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरु लागली होती. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वप्रथम ५ जुलै रोजी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच बोरिस जॉन्सन यांच्या कट्टर समर्थक प्रिती पटेल यांनीही बोरिस जॉन्सन यांच्यावर विश्वास नसल्याचे कारण देत आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ऋषी सुनक यांच्या अर्थमंत्री पदाच्या राजीनाम्यानंर बोरिस जॉन्सन यांनी नदिम जाहवी यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. अर्थमंत्री नियुक्ती झाल्यानंतर नदिम जाहवी यांनीही ट्वीट करत जॉन्सन पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता.

हेही वाचा- Kaali Poster Row : “अशा भारतात राहायचे नाही, जिथे…”; महुआ मोईत्रांचे विरोधकांना प्रत्युत्तर

ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे दावेदार

बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऋषी सुनक मूळचे भारतीय असून इन्फोसेसचे सह संस्थापक नारायण मूर्तींचे जावई आहेत. सुनक यांच्या व्यतरिक्त पेनी मॉरडॉन्ट, बेन वॉलेस, साजिद वाजिद, लिज ट्रस, डोमिनिक राब यांचे सुद्धा नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत घेण्यात येत आहे.