UK Cops Arresting Dying Teen bodycam video released : वर्णद्वेषी हल्ल्याचा बळी पडला असल्याचा दावा करत एका भारतयी वंशाच्या तरुणाने युनायटडेड किंग्डनमध्ये एका तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर ब्रिटिश पोलिसांनी त्याला मरणासन्न अवस्थेतच पकडलं. दरम्यान, या प्रकरणामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी वर्षणद्वेषाचा खोटा दावा केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, ब्रिटिश पोलिसांनी त्या मरणासन्न तरुणाला बेड्या ठोकल्याचे बॉडी कॅमेरा फुटेज समोर आल्याने युकेमध्ये जनक्षोभ उसळला. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
एका भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीने वर्णद्वेषी हल्ल्याचा बळी ठरला असल्याचा दावा करत या तरुणावर सुरा भोसकला होता. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युनायटेड किंगडम (UK) मध्ये पोलिसांवर संताप व्यक्त केला गेला. या व्हिडिओमध्ये १८ वर्षांचा हेन्री नोव्हाक दक्षिण इंग्लंडमधील किनारपट्टीचे शहर साउदम्प्टन येथील एका निवासी रस्त्यावरील पदपथावर गंभीर जखमी अवस्थेत असल्याचं दिसतंय. अशा अवस्थेतच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तो वारंवार पोलिसांना “मला श्वास घेता येत नाहीये” असंही तो पोलिसांना सांगत होता.
दरम्यान, नोव्हाकवर चाकू हल्ला झाला असल्याचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला. व्हिडिओमध्ये नोव्हाक पाठीवर झोपलेला असून तो आपल्याला भोसकले गेल्याचे सांगत आहे, तर पोलीस त्याचे मनगट पकडून त्याला बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तो वारंवार आपल्याला श्वास घेता येत नसल्याचे सांगत होता. व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी म्हणाला, “तुला भोसकले गेले आहे? कुठे? मला असे वाटत नाही मित्रा.”
नेमकं काय घडलं?
डिसेंबर महिन्यात भारचीय वंशाच्या विक्रम दिगवाने युकेमध्ये हेन्री नोव्हाकवर चाकू हल्ला. हेन्री नोव्हाकने वर्णद्वेष केला असल्याचा दावा करत दिगवाने त्याच्यावर हल्ला केल्याचा दावा केला गेला. या हल्ल्यानंतर नोव्हाक दक्षिण इंग्लंडमधील किनारपट्टीचे शहर साउदम्प्टन येथील एका निवासी रस्त्यावरील पदपथावर गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. पोलिसांनी नोव्हाकला रक्ताळलेल्या अवस्थेतच अटक केली. मला श्वास घेता येत नाहीय, असं नोव्हाकेन वारंवार सांगूनही पोलिसांनी त्याचं ऐकलं नाही. साउदम्प्टन विद्यापीठाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेला नोव्हाक मित्रांसोबत बाहेर गेला असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
हल्लेखोराला जन्मठेपेची शिक्षा
अधिक चौकशी आणि तपासानंतर अधिकाऱ्यांना त्याच्या जखमा आढळल्या, तेव्हा त्यांनी त्याच्या बेड्या काढल्या आणि सीपीआर (CPR) सुरू केला, असे पोलिसांनी सांगितले. दिगवाला नंतर साउदम्प्टन क्राउन कोर्टात हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्याला २१ वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश विल्यम मौसले यांनी दिगवाला सांगितले की, नोव्हाकने त्याच्याशी काहीही वर्णद्वेषी वक्तव्य केले यावर त्यांचा विश्वास नाही. असा दावा करणारे तुम्ही एकमेव व्यक्ती आहात आणि हे त्याच्या पूर्वीच्या चारित्र्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.”
शिक्षेच्या सुनावणीनंतर पीडितेचे वडील मार्क नोव्हाक यांनी सांगितले की, हे प्रकरण वर्णद्वेष किंवा धर्माबद्दल नाही. त्यांना आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे रस्ते अधिक सुरक्षित व्हावे असे वाटते आणि याचा वापर अधिक दरी, द्वेष किंवा तणाव निर्माण करण्यासाठी केला जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे.
युनायटेड किंगडममध्ये संताप
दिगवाच्या शिक्षेनंतर मंगळवारी रात्री साउदम्प्टन पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोकांनी अटकेचा निषेध केला, काही आंदोलक मला श्वास घेता येत नाहीये अशा घोषणा देत होते. त्यानंतर एका मोठ्या गटाने नोव्हाकची हत्या झाली त्या भागाजवळ मोर्चा काढला आणि दंगल नियंत्रण पोलिसांशी त्यांची चकमक झाली. आंदोलकांनी खुर्च्या, दगड आणि फ्लेअर्स (फ्लॅश लाईट्स) फेकल्यामुळे पोलिसांना मागे हटावे लागले. पंतप्रधान कीर स्टारमर यांनी सांगितले की, हा व्हिडिओ पाहून त्यांना तीव्र दुःख झाले आहे. ते म्हणाले की, या प्रकरणात “वर्णद्वेषाच्या आरोपांमुळे निर्णय प्रक्रियेवर कसा परिणाम झाला” याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
