पीटीआय, लंडन

‘रॉयल एअर फोर्स’च्या तळावर दहशतवादी हल्ल्याचा कट केल्याचा आरोप असलेले आणि दहशतवादविरोधी पोलिसांनी अटक केलेले पाचही जण ब्रिटिश नागरिक असल्याचे समोर आले आहे. पाचही जण २० ते ३० वयोगटातील असून, पोलीस संशयितांची चौकशी करीत आहेत.

ब्रिटनच्या हवाई दलाच्या फेअरफोर्ड येथील तळाच्या दिशेने येत असलेली तीन संशयित वाहने तपास यंत्रणेने रविवारी पहाटे पकडली. त्यातील पाच जणांना स्फोटके बाळगण्याच्या आणि दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याच्या आरोपांखाली अटक केली.

या घटनेचा पोलीस कसून तपास करीत आहेत. आरोपींचे हेतू आणि संभाव्य हल्ल्यामागील कारण पोलीस तपासत आहेत. पाचही जण रशिया अथवा इराणसाठी काम करीत होते का, किंवा संभाव्य हल्ल्यामागील उद्देश काय होता, हे अद्याप समोर आलेले नाही.