युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त काळ युद्ध सुरु आहे. या युद्धात दोन्ही देशाचे नुकसान झाले आहे. मात्र, युक्रेनचे जास्त नुकसान झाले आहे. युक्रेनमधील अनेक शहरे या युद्धात उध्वस्त झाली आहेत. तर दुसरीकडे नाटो प्रमुखांनी या युद्धाबाबत मोठा दावा केला आहे.

युक्रेन हे युद्ध जिंकू शकते
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचे (नाटो) प्रमुख जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी दावा केला की, युक्रेन रशियासोबत युद्ध जिंकू शकते. बर्लिनमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीदरम्यान स्टोलटेनबर्ग यांनी हा दावा केला आहे. तसेच नाटो देशांनी युक्रेनला लष्करी मदत पाठवावी असे आवाहनही प्रमुखांनी केले आहे. युक्रेनचे नागरिक आपल्या देशाचे रक्षण करत आहेत. युक्रेन हे युद्ध जिंकू शकते, आपल्याला युक्रेनला पाठिंबा द्यायला हवा, असेही स्टोलटेनबर्ग म्हणाले.

फिनलँड नाटोमध्ये सामील होण्याची शक्यता
फिनलँड नाटोमध्ये सामील होण्यात तयार असल्याचेही स्टोलटेनबर्ग म्हणाले. फिनलँडच्या सदस्यत्वामुळे नाटोची सामायिक सुरक्षा वाढेल आणि नाटोचे दरवाचे सगळ्यांसाठी उघडे असल्याचा एक संदेश पोहोचेल असेही ते म्हणाले. युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाबाबत स्टोलटेबर्ग म्हणाले, की रशियाने युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते अपयशी झाले. आता रशिया खार्किमधून माघार घेत आहे. तसेच डॉनवासमधील आक्रमणही रशियाने थांबवले असल्याचे नाटो प्रमुखांनी सांगितले.

नाटोचे दरवाजे सर्वांसाठी खुले
यावर स्टोल्टनबर्ग म्हणाले की, फिनलंडने नाटोमध्ये सामील होण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. ते म्हणाले की फिनलंडच्या सदस्यत्वामुळे आमची सामायिक सुरक्षा वाढेल. तसेच, यातून नाटोचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचा संदेश जाईल. तसेच जर्मनीचे परराष्ट्र मंत्री अॅनालेना बेरबॉक यांनी युक्रेनला लष्करी मदत करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. तसेच जोपर्यंत युक्रेनला समर्थनाची गरज आहे तोपर्यंत नाटो देशांनी पाठिंबा सोडू नये असे आवाहनही बेरबॉक यांनी केले आहे