एपी, जिनिव्हा

युक्रेनमध्ये शांततेचे पहिले पाऊल टाकण्याच्या उद्दिष्टाने इक्वेडोर, आयव्हरी कोस्ट, केनिया आणि सोमालियाचे अध्यक्ष अनेक पाश्चात्य राष्ट्रप्रमुख, सरकार आणि इतर नेते येत्या शनिवार-रविवारच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत रशिया मात्र अनुपस्थित असणार आहे. युरोपियन संस्था आणि संयुक्त राष्ट्रांसह सुमारे १०० शिष्टमंडळे, युक्रेनचे अध्यक्ष वालोदिमिर झेलेन्स्की यांच्यासह ५०हून अधिक राज्य आणि सरकार प्रमुख बर्गेनस्टॉक रिसॉर्टमध्ये होणाऱ्या परिषदेत सहभागी होतील, असे परिषदेचे आयोजन करणाऱ्या स्वित्झर्लंडच्या (स्विस) अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> भारत-पश्चिम आशिया-युरोप मार्गिकेला चालना; पायाभूत प्रकल्पांसाठी ‘जी७’ राष्ट्रे कटिबद्ध असल्याची शिखर परिषदेत चर्चा

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस परिषदेला उपस्थित राहणार आहेत, तर तुर्की आणि सौदी अरेबियाने त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले आहे. ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिकाही परिषदेचे प्रतिनिधित्व करतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीशिवाय ही परिषद निरुपयोगी होईल, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. तर सहभागींमध्ये अनेकांना दुसऱ्या महायुद्धातील युरोपमधील सर्वात रक्तरंजित संघर्षापेक्षा युक्रेन-रशिया युद्ध अधिक गंभीर समस्या असल्याचे वाटते. रशियाला पाठिंबा देणारा चीनही परिषदेत सहभागी होत आहे. कोणत्याही शांतता प्रक्रियेत रशिया आणि युक्रेन या दोघांचा सहभाग असणे आवश्यक आहे. आम्ही शांततेसाठी स्वत:च्या कल्पना मांडल्या असल्याचे, चीनने म्हटले आहे.

तीन धोरण सादर

राजकीय रणनीतीच्या विरोधात शिखर परिषदेच्या आयोजकांनी तीन धोरणे सादर केली. त्यात अणु सुरक्षा; मानवतावादी मदत आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण; तसेच जागतिक अन्न सुरक्षा आदींचा समावेश आहे.

२०२२च्या अखेरीस झेलेन्स्की यांनी १०-बिंदू शांतता सूत्रात मांडलेल्या प्रस्तावांचा आणि वादग्रस्त मुद्द्यांचा समावेश आहे. पुतीन सरकारला युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वाटाघाटी केलेल्या कराराच्या मसुद्याच्या आसपास शांतता करार करावा, अशी इच्छा आहे. ज्यामध्ये युक्रेनच्या तटस्थ स्थितीसाठी आणि त्यांच्या सशस्त्र दलावर मर्यादा असाव्यात.