रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीला आक्रमण केलं, तेव्हापासून या दोन्ही देशांदरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की त्यांच्या ठाम भूमिकेमुळे हिरो ठरू लागले आहेत. अशातच रशियाने गेल्या आठवड्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना ठार मारण्याचे तीन प्रयत्न केले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु तिन्ही वेळा हा प्रयत्न फसल्याची माहिती मिळत आहे.

Ukraine War: “भारताने काय करावं हे त्यांना सांगण्याची…”; UN मधील भारताच्या भूमिकेवरुन फ्रान्सचे खडे बोल

Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

टाइम्स ऑफ लंडनने दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनियन अधिकार्‍यांना धमकीचा इशारा दिल्यानंतर झेलेन्स्कीच्या हत्येचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. टाइम्स ऑफ लंडनने दिलेल्या वृत्तानुसार, युद्धविरोधी रशियन लोकांनी युक्रेनच्या इंटेलला अशी माहिती दिली की, झेलेन्स्की यांना मारण्यासाठी दोन गट नेमण्यात आले आहे. त्यानंतर युक्रेनकडून हा हत्येचा कट उधळला गेला. राजधानी किव्हमध्ये हल्लेखोरांना मारण्यात आलं.

Ukraine War: “माझ्या छातीतून गोळी…”; किव्हमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यानं सांगितली आपबीती

 “आम्हाला याबद्दल रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसकडून माहिती मिळाली आहे, ज्यांना या रक्तरंजित युद्धात भाग घ्यायचा नाही,” असं युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण सचिवांनी स्थानिक टीव्ही स्टेशनला सांगितले. हत्येच्या दोन प्रयत्नांमागे क्रेमलिन-समर्थित वॅगनर गट होता. जर ते प्रयत्न यशस्वी झाले असते तर, मॉस्को हत्येच्या कटात थेट सहभाग नाकारू शकला असता, असंही टाईम्सने म्हटलंय.

Ukraine War: युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर रशियाचा हल्ला, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी शेअर केला Video

“ते तिथे एका उच्च-प्रोफाइल मिशनसह जाणार होते. ज्याला रशियन लोकांचा विरोध आहे. झेलेन्स्की यांची हत्या घडवून आणणं हे, एक खूप मोठं मिशन आहे. रशियन सार्वभौम धोरणावरील प्रभावाच्या दृष्टीने, हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे मिशन असून त्याचा युद्धावर मोठा परिणाम होईल,” असं एका राजनैतिक सुत्राने सांगितल्याचं वृत्तही त्यांनी दिलंय.