पुतीन यांना 'ही युद्धाची वेळ नव्हे' सांगणाऱ्या नरेंद्र मोदींचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले आभार, म्हणाले "अखंडता..." | Ukraine President Volodymyr Zelenskyy thanks PM Narendra Modi for his support amid Russia-Ukraine war sgy 87 | Loksatta

पुतीन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ सांगणाऱ्या नरेंद्र मोदींचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले आभार, म्हणाले “अखंडता…”

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

पुतीन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ सांगणाऱ्या नरेंद्र मोदींचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले आभार, म्हणाले “अखंडता…”
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असा सल्ला दिल्यानंतर जगभरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. व्लोदिमिर झेलेन्स्की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन एकमेकांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा संघर्षांवर संवादातून मार्ग काढण्याची गरज अधोरेखित केली.

युक्रेनची अखंडता कायम राखण्यासाठी दिलेल्या पाठिंब्यासाठी झेलेन्स्की यांनी मोदींचे आभार मानले. तसंच युद्धासाठी ही योग्य वेळ नसल्याचं या मोदींच्या वक्तव्याचं महत्त्वही सांगितलं. दरम्यान ‘युक्रेन संघर्षांवर लष्करी मार्गाने कोणताही तोडगा निघू शकणार नाही. या संघर्षांमुळे युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्प धोक्यात आले आहेत. याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात,’’ अशी चिंता पंतप्रधान मोदींनी मंगळवारी व्यक्त केली.

ही युद्धाची वेळ नव्हे! ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सल्ला

पंतप्रधान कार्यालयाने प्रसृत केलेल्या निवेदनानुसार, या दूरध्वनी संभाषणात मोदी व झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील संघर्षांवर चर्चा केली. हे युद्ध व तणाव लवकरात लवकर संपवण्याची गरज आहे. त्यासाठी संवाद व मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याची आवश्यकता असल्याचे मोदींनी या वेळी सांगितले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी योग्य बोलले”, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक मंचावर जाहीरपणे मांडली भूमिका

युक्रेनने गेल्या आठवडय़ात रशियाने सार्वमत घेऊन ताबा मिळवलेल्या चारपैकी दोन प्रांतात लक्षणीय आगेकूच केली आहे. युक्रेनसह पाश्चात्त्य देशांनी व अमेरिकेने या युक्रेनच्या डोनेस्क, लुहान्स्क, खेरसन आणि झोपोरीझिया चार प्रांतांत रशियाने घेतलेले सार्वमत अवैध ठरवून नाकारले आहे. हे सार्वमत जबरदस्तीने घेतल्याने बेकायदेशीर आहे, असे युक्रेनचे म्हणणे आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या लाल चौकातील सोहळय़ात या प्रांतांचे विलीनीकरण जाहीर केले होते.

मोदी आणि पुतीन यांच्यात काय चर्चा झाली होती?

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २२वी वार्षिक परिषदेच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट झाली होती. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली. यावेळी द्विपक्षीय चर्चेत मोदींनी युक्रेन युद्धाबाबत चिंता व्यक्त केली. ‘ही युद्धाची वेळ नव्हे’, असा सल्लाही त्यांनी दिला होता.

“अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचे आव्हान सध्या जगासमोर आहे. करोना महासाथ आणि युक्रेनमधील संघर्षांमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट निर्माण झाले आहे. त्यासाठी लवचीक पुरवठा साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तम संपर्क यंत्रणा आणि देशादेशांतील परस्पर आयात-निर्यातीची प्रक्रियाही सुलभ करणे महत्त्वाचे आहे,” असं मोदींनी सांगितलं होतं.

पुतीन काय म्हणाले होते?

“युद्धाबाबतची तुमची (मोदी) चिंता मी समजू शकतो. युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आमचीही इच्छा आहे. मात्र युक्रेनने चर्चेत रस दाखवलेला नाही,” असं पुतीन म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Jammu Kashmir: लष्कराने तीन दिवसात घेतला बदला, अधिकाऱ्याच्या हत्येत सहभागी दहशतवाद्यांना केलं ठार, चकमक अद्यापही सुरु

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी कोणत्या हत्यारांचा वापर केला? नार्को चाचणीत आफताबचे धक्कादायक खुलासे
बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
तीन लग्नं, घटस्फोट अन्… वैवाहिक आयुष्यातील अपयशानंतर अशी झालेली शाहिदच्या आईची अवस्था
शिंदे- फडणवीस सरकारला मोठा धक्का, महाविकास आघाडी सरकारच्या विकासकामे रद्दच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
IND vs BAN: न्यूझीलंडहून परतणारे टीम इंडियाचे खेळाडू खराब व्यवस्थेचे बळी; दीपक चहरने केली तक्रार, जाणून घ्या प्रकरण
‘…यामुळेच सातत्याने अशा घटना घडत आहेत’; वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातांवरून सचिन सावंतांची भाजपावर टीका
‘खात्यात पैसे का नाहीत?‘ म्हणत बाईने घातला बॅंकेत राडा; दगडाने फोडल्या ATM च्या काचा अन्…