रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेननेही रशियाला जशाच तसं उत्तर दिल्याचा दावा केलाय. रशियाची सहा विमानं आणि एक हेलिकॉप्टर आम्ही पाडल्याचा दावा युक्रेननं केलाय. युक्रेनमधील लुहान्स प्रांतामध्ये आम्ही ही विमानं पाडल्याचा दावा युक्रेननं केलाय. लुहान्स्क हा युक्रेनमधील बंडखोर प्रांतांपैकी एक आहे. याच आठवड्यामध्येच रशियाने लुहान्स्कला वेगळा देश म्हणून घोषित केलं आहे.

रशियन लष्कराने युक्रेनकडून करण्यात आलेला हवाई हल्ला आम्ही हाणून पाडल्याचा दावा केलाय. युक्रेनच्या उत्तरेकडून रशियाने हल्ला केला असून रशियन सैन्य युक्रेनच्या भूप्रदेशात शिरलं आहे. त्याचबरोबरच ब्रुसेल्समधूनही रशियाने युक्रेनवर हल्ला चढवलाय. मात्र या हल्ल्याला युक्रेनकडूनही जोरदार उत्तर दिलं जात आहे. युक्रेनच्या लष्कराने Shchastya प्रांत आपल्या ताब्यात आला असून रशियाच्या ५० लष्करी जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. 

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
How did Indian young man go to fight in Russia-Ukraine war Will they be rescued
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भारतीय तरुण कसे गेले? त्यांची सुटका होणार का?

नक्की पाहा >> Video: रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियात दाखल झालेले पाकिस्तानी PM विमानातून उतरल्या उतरल्या म्हणाले…

रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशियाच्या विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगितलं असून या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> Russia-Ukraine Crisis : पुतिन यांना इंग्रजी येतं का?; त्यांना किती आणि कोणत्या भाषा येतात?

एकाच वेळी रशियाने अनेक बाजूंनी युक्रेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली असून जवळजवळ २५ ठिकाणी हल्ले केले आहेत. आमच्यावर हल्ला करुन जबरदस्तीने आमच्या देशावर ताबा मिळवण्याचा हा रशियाचा आक्रमक पवित्रा आहे. आमच्या देशातील शांततापूर्ण शहरांवर रशिया सध्या सर्व बाजूंनी हल्ले करत आहे, असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. ईशान्येकडून रशियन लष्कर देशामध्ये घुसखोरी करत असल्याचंही युक्रेननं म्हटलंय. देशाची राजधानी कीव आणि दुसरं सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या कारकीवमधील लष्करी तळांवर रशियाने मिसाइलने हल्ला केल्याचं युक्रेनच्या गृहमंत्रालयाने म्हटलंय. मात्र त्यावेळी त्यांनी उत्तरादाखल केलेल्या प्रतिहल्ल्यात पाच विमानं पाडल्याचा दावाही केलाय. त्यानंतर आणखीन एक विमान पाडल्याची माहिती समोर आलीय.

रशियाने युद्धाची घोषणा करताच युक्रेन सरकारने राजधानी कीवमधील विमानतळं रिकामं केलं आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावरुन हलवण्यात आलं आहे. रशियाने लष्करी कारवाईची घोषणा करतानाच युक्रेनची राजधानी कीव आणि पूर्वेकडील बंदरावरील शहर मारीऊपॉल येथे स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपला देश पुतीन यांनी पुकारलेल्या युद्धामध्ये आपलं रक्षण करेल आणि विजयीदेखील होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉची घोषणा केली आहे. तसंच रशियाने हल्ला सुरु केला असली तरी घाबरु नका असं आवाहन केलंय. ‘मार्शल लॉ’ घोषित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे हक्क काढून घेत देशाच्या कामकाजावर लष्कराचं नियंत्रण आणलं जातं.

रशियाचा युक्रेनवर हल्ला : भारतावर काय परिणाम होतील?

अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजवत युक्रेनने सतर्कतेचा इशारा दिलाय. एकीकडे नागरिकांना इशारा देताना दुसरीकडे आम्ही पूर्ण ताकदीनं लढणार आहोत असं युक्रेनने आधीच स्पष्ट केलंय. त्यानुसार युक्रेन रशियाच्या हवाई हल्ल्यांना उत्तर देण्यास सुरुवात केलीय. रशियन फायटर जेट्स पाडण्यासाठी युक्रेनच्या संरक्षण दलांकडून जमीनीवरुन मारा केला जातोय.

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युक्रेनच्या राजदूतांनी रशियाने युद्ध पुकारलं असल्याची माहिती दिली. “रशियन फेडरेशनच्या राजदुतांनी तीन मिनिटांपूर्वी राष्ट्राध्यक्षांनी आमच्या देशावर युद्ध पुकारल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे,” असं त्यांनी संयुक्त राष्ट्राने तातडीने बोलावलेल्या बैठकीत सांगितलं.
रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी घोषणा केलेली विशेष कारवाई ही गेल्या कित्येत वर्षांपासून त्रास सहन करणाऱ्या युक्रेनच्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी आवाहन केलं असून मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला असून युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. युरोपमध्ये नवं युद्ध होण्याची भीती असल्याने त्यांनी मध्यस्थीची विनंती केली आहे. महत्वाचं म्हणजे नेहमी रशियाची बाजू घेणाऱ्या चीननेही देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सीमांचा आदर करण्यासंबंधी भाष्य केलं आहे.