scorecardresearch

Ukraine War CCTV Video : रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सायकलस्वारावर पडला बॉम्ब

नागरी वस्त्यांवर हल्ला करत नसल्याचा दावा केला जात असला तरी तो किती चुकीचा आहे हे या व्हिडीओमधून दिसतंय.

civilians were shot in Ukraine
हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालाय

युक्रेन युद्धामध्ये रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरु आहेत. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला. आम्ही नागरी वस्त्यांवर हल्ला करत नसल्याचा दावा रशियाकडून केला जात असता तरी सत्य परिस्थिती वेगळीच असल्याचं दिसतंय. युक्रेनमधील युद्धाची दाहकता दाखवणारं एक सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलं आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: एका बेटासाठी १३ जवान शहीद; रशियन जहाजाला पाहून म्हणाले होते “इथून…”

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला असून भीतीने नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतला आहे, तर काही नागरिक पश्चिमात्य देशांमध्ये आश्रयाला जात आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की साधं रस्त्यावर चालणही शक्य नाहीय. याच दाहकतेचा अंदाज व्हायरल झालेल्या एका ४० सेकंदांच्या व्हिडीओमधून येतोय.

नक्की वाचा >> Ukraine War: त्या २४ वर्षीय तरुणीची Instagram स्टोरी जगभरात चर्चेचा विषय; ‘पुतिन कनेक्शन’मुळे स्क्रीनशॉट व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका सायकस्वारावरच हवेमधून बॉम्ब पडत असल्याचं दिसतंय. अचानक मोठा स्फोट होतो आणि सगळीकडे आग दिसू लागते. हा सारा घटनाक्रम एका इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झालाय. हा व्हिडीओ उमान शहरातील असल्याची माहिती समोर आली असल्याचं डेली मेलने म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Video: आजींनी रशियन सैनिकाला भरचौकात झापलं; नंतर त्याच्या हातावर सूर्यफुलाच्या बिया टेकवत म्हटल्या, “या खिशात ठेव म्हणजे…”

रशियाने युक्रेनला पूर्व, उत्तर आणि दक्षिणेकडून घेरले असून रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या जवळ पोहोचले आहे. किव्ह शहरात स्फोटांचे आवाज आले असले तरी रशियाने मात्र किव्हवर हल्ला केला नसल्याचे स्पष्ट केले. वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, किव्ह येथे पाडण्यात आलेले विमान युक्रेनचे होते, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले, तर ते विमान रशियाचे असल्याचा दावा युक्रेनने केला. आपण २०० हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग फोर्सच्या मदतीने अन्तोनोव्ह विमानतळावर ताबा मिळवला, असा दावा रशियन लष्कराने केला.

नक्की पाहा >> Photos: व्लादिमिर Vs वोलोडिमिर! युक्रेन युद्धात पुतिन यांना नडणारा ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’

प्राथमिक आकडेवारीनुसार, गुरुवारी पहाटे रशियाने आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या काही सैनिकांसह १३७ जण ठार आणि ३१६ जण जखमी झाले, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी उशिरा दिली. रशियाने राजधानी किव्हसह अन्य शहरांवर हवाई हल्ले केल्यामुळे युक्रेनमधील हजारो लोक सुरक्षिततेसाठी पश्चिमात्य देशांमध्ये पळून जात आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2022 at 14:45 IST
ताज्या बातम्या