ल्यिव्ह : युक्रेनमधील मारिओपोल या वेढल्या गेलेल्या महत्त्वाच्या बंदराच्या शहरातून नागरिकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात त्या शहरातील युक्रेनच्या फौजांनी शस्त्रे खाली टाकून पांढरे निशाण उभारावे, ही रशियाने केलेली मागणी युक्रेनी अधिकाऱ्यांनी जोरकसपणे फेटाळून लावली.

मरिओपोलला शरण येण्यास भाग पाडण्यासाठी रशिया त्याच्यावरील आक्रमण सातत्याने वाढवत असला, तरी युक्रेनच्या इतर भागांतील त्याचे आक्रमण फसले आहे. रशिया शहरांवर बॉम्बवर्षांव सुरूच ठेवत असल्यामुळे हा व्यापक संघर्ष आता एकमेकांना थकवण्याच्या युद्धात रूपांतरित होत आहे, असे पाश्चिमात्य सरकारे आणि विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

राजधानी किव्हमध्ये, शहराच्या केंद्राजवळील दाट लोकवस्तीच्या पोडील डिस्ट्रिक्टमधील एका शॉिपग सेंटरवर आदल्या दिवशी तोफगोळय़ांचा मारा करण्यात आल्यानंतर उद्ध्वस्त झालेली ही इमारत सोमवारी आगीने धुमसत होती. या हल्ल्यात ८ जण ठार झाल्याचे आकस्मिक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे आसपासच्या उंच इमारतींमधील प्रत्येक खिडकी उन्मळून पडली. ईशान्य युक्रेनमधील एका रासायनिक संयंत्रावरही रशियाने तोफगोळय़ांचा मारा केल्याचेही युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

या हल्ल्यामुळे गळती झालेला विषारी अमोनिया वायू हवेत पसरला. याशिवाय पश्चिमेकडील एक लष्करी प्रशिक्षण तळावरही रसियाने क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे ते म्हणाले.

या युद्धाची सर्वाधिक झळ अझॉव्ह समुद्रातील मारिओपोल या दक्षिणेकडच्या शहराला बसली आहे. रशिया गेले तीन आठवडे त्याच्यावर जोरदार मारा करत आहे. हा निर्दयी हल्ला म्हणजे ‘युद्ध गुन्हा’ असल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.