युक्रेनच्या दक्षिण-पूर्वेकडील शहर मारियुपोलमध्ये रशिया आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये सर्वात मोठा स्टील प्लांट काबीज करण्यासाठी जोरदार युद्ध झाले. रशियन सैन्याच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एक प्लांट मारियुपोल येथे होता. हा प्लांट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. युरोपातील सर्वात मोठ्या लोह आणि पोलाद कारखान्यांपैकी एक असलेल्या अझोव्स्टलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

युक्रेनच्या खासदार लेस्या वासिलेंको यांनी हा प्लांट उद्ध्वस्त झाल्यानंतर एक ट्वीट केलंय. त्यात म्हटलंय की, “युरोपमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एक उद्ध्वस्त झाला. हा प्लांट उद्ध्वस्त होणं हे युक्रेनसाठी खूप मोठं आर्थिक नुकसान आहे. शिवाय यामुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे.” या ट्विटसोबत वासिलेंको यांनी एका या प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये होणारे स्फोट आणि धूर दिसत आहे.

Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

दरम्यान, युक्रेनवरील आक्रमण सुरू ठेवण्याची किंमत रशियाला ‘येत्या अनेक पिढय़ांपर्यंत’ मोजावी लागेल, असा इशारा युक्रेनच्या अध्यक्षांनी शनिवारी दिला. आपल्या अडकून पडलेल्या सैनिकांच्या समर्थनासाठी रशियाने मोठा मेळावा आयोजित केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, रशिया युक्रेनमधील शहरांना शरणागती पत्करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही युक्रेनच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

‘रशियाला किंमत मोजावी लागेल’; युक्रेनच्या अध्यक्षांचा इशारा

 रशिया जाणूनबुजून ‘एक मानवी संकट’ निर्माण करत असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रात्री एका दूरसंदेश भाषणात केला आणि आणखी रक्तपात टाळण्यासाठी आपल्याला भेटण्याचे आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना केले.