scorecardresearch

Ukraine War: रशियाबरोबरच पुतिन यांच्या अडचणी वाढणार; ‘जी सेव्हन’ राष्ट्रे म्हणाली, “या युद्धासाठी रशियाला…”

ब्रुसेल्समध्ये शुक्रवारी झालेल्या जी सेव्हन राष्ट्रांच्या बैठकीनंतर या गटाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख.

G7
जी सात देशांची शुक्रवारी बैठक पार पडली (फाइल फोटो, सौजन्य : रॉयटर्स)

युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यासंदर्भात जी ७ या राष्ट्रांच्या गटांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात भूमिका घेतलीय. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या सात राष्ट्रांचा गट असणाऱ्या जी सेव्हनमधील राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाने युक्रेनमधील युद्धासंदर्भात महत्वाचं भाष्य केलंय. (युक्रेन युद्धाचे लाइव्ह अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा) युक्रेनमध्ये सर्वसामान्यांवर केलेल्या लष्करी हल्ल्यासाठी जे लोक कारणीभूत आहेत त्यांना जबाबदार धरलं पाहिजे असं मत व्यक्त केलंय. या हल्ल्यांमध्ये क्लस्टर बॉम्बसारख्या बंदी घालण्यात आलेल्या अस्त्रांचा वापर करण्यात आल्याने या गुन्ह्यांसाठी योग्य ती कारवाई करणं गरजेचं असल्याचं जी सेव्हनमधील राष्ट्रांनी म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

नक्की काय म्हटलं जी-७ ने
ब्रुसेल्समध्ये शुक्रवारी झालेल्या जी सेव्हन राष्ट्रांच्या बैठकीनंतर या गटाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये रशियामधील युद्धाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलीय. “युक्रेनमधील शहरी भागांमध्ये सर्वसामान्य जनतेवर रशियाकडून केले जाणारे हल्ल्यांबद्दल आम्हाला फार चिंता वाटतेय. हे आक्षेपार्ह मानवातावादी संकट चिंतेची बाब आहे,” अस जी सेव्हन राष्ट्रांनी म्हटलंय. ठशांतता आणि सुरक्षा या दोन गोष्टींना प्राधान्य आहे. त्यामुळेच आम्ही या युद्धासाठी रशियाला जबाबदार ठरण्यासंदर्भात चर्चा केली,” असं ट्विटरवरुन सुचित करण्यात आलंय. यामधून जी सेव्हन देशांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पुतिन यांच्याविरोधात लवकरच काहीतरी ठोस निर्णय या सात प्रभावी राष्ट्रांकडून घेतला जाईल असे संकेत दिलेत.

नक्की वाचा >> Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’

जी-८ मधून रशियाला बाहेर काढलं होतं…
विशेष म्हणजे २०१४ च्या क्रिमिया प्रकरणानंतर मार्च महिन्यात जी-८ राष्ट्रांच्या गटामधून रशियाला काढून टाकण्यात आले होते. त्यानंतरही रशियाने क्रिमियावरील दावा सोडला नाही. पुतिन यांच्या आदेशानंतर क्रिमियावर हल्ला करुन तो प्रांत लष्कराने रशियाला जोडून घेतला होता. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडूनही पुति्न यांच्याविरोधात युद्ध आरोपी म्हणजेच वॉर क्रिमिनल म्हणून खटला चालवण्यासंदर्भातील चाचपणी सुरु केल्याचं वृत्तसमोर आलं होतं.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांच्यासोबतच्या ९० मिनिटांच्या कॉलनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा धोक्याचा इशारा; म्हणाले, “भविष्यात युक्रेनसाठी…”

क्लस्टर बॉम्बचा वापर…
रशिया युक्रेनवर ‘क्लस्टर बॉम्ब’चा मारा करीत असल्याचा आरोप नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेनवर  (नाटो)चे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केला. रशिया क्लस्टर बॉम्बचा वापर करीत असल्याचे आम्ही पाहिले आहे. रशियाच्या या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत आहे, असे स्टॉल्टनबर्ग यांनी ब्रसेल्समध्ये पत्रकारांना सांगितले.

नक्की वाचा >> Ukraine War: “भारताने काय करावं हे त्यांना सांगण्याची…”; UN मधील भारताच्या भूमिकेवरुन फ्रान्सचे खडे बोल

युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांचा नाटोवर निशाणा…
युक्रेनच्या हवाई क्षेत्राला निषिद्ध क्षेत्र (नो फ्लाय झोन) जाहीर करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने शुक्रवारी नकार दिला. याच मुद्द्यावरुन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी एका भवनिक भाषणामध्ये नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेनवर (नाटो) कठोर शब्दात टिका केलीय. नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे याच नाटोमध्ये युक्रेनला प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर रशियाने आक्षेप घेतला होता, तर युक्रेनने या देशांसोबत जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केलेत. मात्र आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटोलाच लक्ष्य केलंय.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

नाटोने काय कारण दिलं?
युक्रेनला नो फ्लाय झोन तसे केल्यास त्याची परिणती युरोपात अण्वस्त्रसज्ज रशियाशी युद्ध भडकण्यात होऊ शकते, असा इशारा ‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी शुक्रवारी दिला. ते म्हणाले की आम्ही युक्रेनमध्ये प्रवेश करणार नाही, ना जमिनीवर ना हवाई क्षेत्रात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हवाई वाहतूक निषिद्ध क्षेत्र जाहीर करण्याचे आवाहन पाश्चिमात्य देशांना केले होते.

नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

शुक्रवारी नेमकं काय काय घडलं?
दक्षिण युक्रेनमध्ये युद्धाची तीव्रता वाढली आहे. येथील मारियुपॉल, चेर्निहाइव्ह आणि खार्किव्ह येथे गोळीबार, क्षेपणास्त्र मारा सातत्याने सुरु आहे. खेर्सन शहरावर रशियाने ताबा मिळवला आहे. तर दुसरीकडे अझोव्ह समुद्रावरील मोक्याच्या बंदराच्या सीमेवर असणाऱ्या मारियुपोल शहरामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. काळ्या समुद्राच्या बंदरातील स्थानिक सरकारी मुख्यालय रशियाने ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला युक्रेनियन अधिकाऱ्यांचा दुजोरा दिलाय. आठवड्याभरात युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिकांचे शेजारी देशांमध्ये स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukraine war g7 says war criminals will be held accountable scsg

ताज्या बातम्या