वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑइलने जाहीर केलेल्या किंमतीनुसार दिल्लीत १९ किलोंच्या एलपीजी सिलेंडरमध्ये १९८ रुपयांची घट झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “देशात जे सुरू त्याला केवळ ही महिला जबाबदार”; सर्वोच्च न्यायालयाचे नुपुर शर्मावर ताशेरे

कोणत्या शहरांमध्ये किती दर?
दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २२१९ रुपये होती. आज त्यात १९८ रुपयांची घट झाली असून ही किंमत आता २०२१ रुपयांपर्यंत पोहचली आहे. तर कोलकातमध्ये सिलेंडरच्या दरात १८२ रुपयांची कपात झाली असून २३२२ रुपयांचा सिलेंडर आता २१४० रुपयांना मिळणार आहे. मुंबईत २१७१.५० रुपयांवरून १९८१ रुपयांवर, तर चेन्नईमध्ये २३७१ रुपयांवरून २१८६ रुपयांपर्यंत एलपीजी गॅसची किंमत कमी झाली आहे.
जूनमध्ये व्यावसायिक सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. पहिल्यांदा ७ मे रोजी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती तर १९ मे रोजीही घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

हेही वाचा – “शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचं स्वीकारा,” शिंदे गटाचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले “उद्धव ठाकरेंची प्रतिमा…

वर्षभरात घरगुती सिलिंडर १६८.५० रुपयांनी महागला
दिल्लीत गेल्या एका वर्षात घरगुती सिलिंडरचा दर ८३४.५० रुपयांवरून १००३ रुपयांवर पोहोचला आहे. १४.२ किलो घरगुती सिलेंडरच्या दरात १९ मे २०२२ रोजी ४ रुपयांची शेवटची करण्यात आली होती. यापूर्वी ७ मे रोजी दिल्लीत ९९९.५०रुपये प्रति सिलेंडर दर होता. ७ मे रोजी एलपीजी सिलिंडर २२ मार्च २०२२ रोजी ९४९.५० रुपयांच्या तुलनेत ५० रुपयांनी महागला. २२ मार्चलाही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. यापूर्वी, ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत, दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ८९९.५० रुपये होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uly 1 cooking gas cylinder becomes cheaper from today check price in your city dpj
First published on: 01-07-2022 at 12:19 IST