उमर खालिदला दिल्ली कोर्टाकडून आणखी एक झटका बसला आहे. दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणात त्याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळण्यात आला आहे. दिल्लीतील न्यायालयाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला जामीन नाकारला आहे. उमर खालिदवर दंगलीचा कट रचल्याप्रकरणी आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

उमर खालिदच्या जामीन याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली, त्यानंतर निर्णय आजपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. त्यावर आता न्यायालयाने आदेश दिला आहे. या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांच्यासमोर सुनावणी झाली.

Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
NARENDRA MODI
‘पंतप्रधान मोदींनी निवडणूक लढविण्यावर ६ वर्षांची बंदी घाला’, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल; कारण काय?
Calcutta High Court
संदेशखाली प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार; कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आदेश
Delhi Chief Minister Arvind Kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का; अटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्ली दंगलीनंतर खालिद आणि इतर अनेक जणांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युएपीए हा दहशतवादविरोधी कायदा आहे. दरम्यान, खालिदसह इतरांवर दंगलीचे मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. या दंगलीत ५३ लोक मारले गेले आणि ७०० हून अधिक जखमी झाले होते.