Premium

गुटेरेस यांचे युद्धविरामाचे आवाहन; क्वचित वापरल्या जाणाऱ्या नियमाचा संदर्भ

संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी-जनरल अँटोनियो गुटेरेस यांनी गाझा पट्टीत मानवतावादी युद्धविरामाचे आवाहन केले आहे.

UN Secretary General Antonio Guterres calls for a humanitarian ceasefire in the Gaza Strip
गुटेरेस यांचे युद्धविरामाचे आवाहन; क्वचित वापरल्या जाणाऱ्या नियमाचा संदर्भ

पीटीआय, संयुक्त राष्ट्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी-जनरल अँटोनियो गुटेरेस यांनी गाझा पट्टीत मानवतावादी युद्धविरामाचे आवाहन केले आहे. गुटेरेस यांनी यासंबंधी बुधवारी सुरक्षा परिषदेचे डिसेंबर महिन्यासाठी असलेले अध्यक्ष आणि इक्वादोरचे संयुक्त राष्ट्रांमधील कायमस्वरूपी प्रतिनिधी राजदूत होजे हॅव्हियर डे ला गास्क लोपेज डॉमिन्ग्वेझ यांना पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी क्वचितच वापरल्या जाणाऱ्या ‘यूएन चार्टर’च्या अनुच्छेद ९९चा संदर्भ दिला आहे.

गुटेरेस यांनी इस्रायल-हमास युद्धामध्ये मानवतावादी युद्धविरामाचे आणि मानवतावादी संकट टाळण्याचे आवाहन केले आहे. या युद्धामध्ये गाझामधील पॅलेस्टिनी आणि शांततेचे होणारे नुकसान कधीही भरून निघणारे नाही असेही गुटेरेस यांनी नमूद केले आहे. या पत्रामध्ये गुटेरेस यांनी लिहिले आहे की, गाझा आणि इस्रायलदरम्यान आठ आठवडय़ांपेक्षा जास्त काळ चाललेल्या संघर्षांमुळे लोकांचे हाल होत आहेत, भौतिक विध्वंस होत आहे आणि इस्रायल व पॅलेस्टाईनच्या व्याप्त भूभागामध्ये लोकांचे मनस्वास्थ्य धोक्यात आले आहे.

हेही वाचा >>>बीएमडब्ल्यू कार, १५ एकर जमीन, सोन्याची मागणी ,प्रचंड हुंडय़ाच्या मागणीमुळे वाग्दत्त वधूची आत्महत्या, डॉक्टर वराला अटक

‘यूएन चार्टर’ हा संयुक्त राष्ट्रांचा मानवाधिकार जाहीरनामा आहे. त्याच्या अनुच्छेद ९९मध्ये असे नमूद करण्यात आले आहे, की ‘सेक्रेटरी-जनरल यांच्या मते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा धोक्यात आणू शकते असे कोणतेही प्रकरण ते सुरक्षा परिषदेच्या निदर्शनाला आणून देऊ शकतात’. अनुच्छेद ९९चा वापर फारसा झालेला नाही. त्याचा अखेरचा वापर १९७१मध्ये तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातील परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे तत्कालीन सेक्रेटरी-जनरल यू थांट यांनी केला होता.

गुटेरेस यांच्या पत्रावर इस्रायलने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुटेरेस यांचा कार्यकाळ हा जगासाठी धोकादायक असल्याची टीका इस्रायलकडून करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Un secretary general antonio guterres calls for a humanitarian ceasefire in the gaza strip amy

First published on: 08-12-2023 at 04:09 IST
Next Story
नागरिकत्व दिलेल्या बांगलादेशी स्थलांतरितांची माहिती द्या; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश