Union Budget 2024-2025 NPS Vatsalya Scheme : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी योजनांची घोषणा केली. यावेळी त्यांनी ‘एनपीएस वात्सल्य’ ही योजनादेखील जाहीर केली. या योजनेद्वारे आता पालकांना त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या शिक्षणाची तसेच वृद्धापळात त्यांच्या पेन्शनची सोय करता येणार आहे.

हेही वाचा – Union Budget 2024 Speech Live Updates: करदात्यांसाठी मोठी घोषणा; नव्या करप्रणालीत ३ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर…

एनपीएस वात्सल्य योजना काय आहे?

निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीएस वात्सल्य ही योजना अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक बचत करण्याच्या उद्देशाने जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनंतर्गत पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने बॅंक खात्यात पैस जमा करू शकतील. तसेच त्याद्वारे राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे खाते मुलांच्या नावे हस्तांतर करता येणार आहे. १८ ते ७० वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरीकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा – Tax Slabs 2024-25 Budget 2024 Live Updates: करदात्यांसाठी मोठी घोषणा; नव्या करप्रणालीत ३ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर…

सरकारकडून इतरही महत्त्वाच्या घोषणा

एनपीएस-वात्सल्या या योजनेशिवाय इतरही महत्त्वाच्या घोषणा निर्मला सीतारमण यांनी आजच्या अर्थसंकल्पात केल्या आहेत. त्यांनीकृषी व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होणार आहे, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे. तसेच शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाणार असून त्यामाध्यमातून देशभरातील ४०० जिल्ह्यामध्ये खरीप पिकांचं सर्वेक्षण आणि मातीची तपासणी केली जोईल आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल, असंही निर्माला सीतारमण म्हणाल्या आहेत.

हेही वाचा – Angel Tax म्हणजे काय? केंद्र सरकारने हा कर रद्द का केला?…

निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या कररचनेत बदल

याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोबाइल डिव्हाइस आणि त्याच्याशी संबंधित उपकरणांवरील सीमाशूल्क १५ टक्क्यांनी कमी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने नव्या कररचनेतदेखील बदल आहेत आहेत. त्यानुसार आता ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. तर त्यावरच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे. या बदलांमुळे नव्या करप्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांचा १७५०० रुपयांचा फायदा होईल, असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.