Budget 2026 three key Kartavya: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तीन प्रमुख कर्तव्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यापैकी पहिले कर्तव्य म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाला गती देणे आणि तो दीर्घकालीन स्वरूपात टिकवून ठेवणे. यासाठी स्पर्धात्मकता वाढवणे तसेच अस्थिर जागतिक घडामोडींविरुद्ध अर्थव्यवस्थेची लवचिकता मजबूत करणे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
दुसरे कर्तव्य म्हणजे लोकांच्या क्षमतांचे बळकटीकरण करून त्यांना भारताच्या समृद्धीच्या प्रवासात सक्रिय भागीदार बनवणे आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणे होय. तिसरे कर्तव्य ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर आधारित असून, प्रत्येक कुटुंब, समुदाय आणि प्रदेशाला आवश्यक संसाधने, सुविधा तसेच अर्थपूर्ण सहभागाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्याचा भर आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नववा अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्प मांडताना त्यांनी तीन कर्तव्यांवर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. अर्थमंत्र्यांनी दिलेली तीन कर्तव्ये सविस्तरपणे जाणून घ्या.
पहिले कर्तव्य
देशाच्या आर्थिक विकासाचा वेग अधिक वाढवणे आणि तो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी देशाची उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवणे, उद्योगांना चालना देणे तसेच जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
दुसरे कर्तव्य
देशातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यासाठी नागरिकांचे कौशल्य विकास, क्षमतावृद्धी आणि रोजगारक्षमतेत वाढ करून त्यांना भारताच्या समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या विकासप्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येणार आहे.
तिसरे कर्तव्य
‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर आधारित सर्वसमावेशक विकास साध्य करणे हे या कर्तव्याचे ध्येय आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंब, समाज आणि प्रदेशाला साधन-संपत्ती, मूलभूत सुविधा तसेच प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

