आई तू परत ये….! केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मातृशोक

आईच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आले असल्याचीही दिली माहिती.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या आईचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून हृदयरोगाशी संबधित उपचार सुरू होते. डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच, आईच्या इच्छेनुसार तिच्या निधनानंतर तात्काळ तिचे नेत्रदान करण्यता आले असल्याचेह डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले आहे.

डॉ.हर्ष वर्धन यांनी ट्विटमध्ये आईसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. ” कळवताना अतिशय दुःख होत आहे की, पृथ्वीतलावरील माझी सर्वात प्रिय व्यक्ती, माझी आई स्वर्गवासी झाली. ती ८९ वर्षांची होती व आज सकाळी हृदय विकाराचा झटक्याने तिचे निधन झाले. माझ्यासाठी महान व्यक्तिमत्व, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थानी असलेली माझी आई गेल्याने मी पोरका झालो, माझ्या आयुष्यात निर्माण झालेली उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. तिच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो.

“आईच्या इच्छेनुसार तिच्या निधनानंतर तात्काळ तिचे नेत्रदान दिल्लीतील एम्स रुग्णालयात करण्यात आले. आज दुपारी तीन वाजता तिचे पार्थिव मौलाना आझाद मेडिकल कॉलेज प्रशासनाकडे सोपवणार आहे. तिचे देहदान आम्हा सर्वांना सदैव समाजासाठी जगण्याची प्रेरणा देत राहील.. ओम शांती !!”अशी फेसबुक पोस्ट देखील डॉ. हर्ष वर्धन यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Union health minister dr harsh vardhans mother dies msr